Car Loan: तुम्ही नवीन कार खरेदी केली आणि त्याचे लोन सुरू असतानाच ती चोरीला Car Stolen गेली, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या कारचे उर्वरित लोन भरावा लागणार का? हेच आपण जाणून घेणार आहोत.    


कार चोरीच्या घटना भारतातच नाही तर जगभरात घडत आहेत. चोर गाड्या Car Stolen चोरून त्यांचे पार्टस वेगळे करून काळ्या बाजारात विकतात. या समस्येबाबत अनेकजण अनेक दिवसांपासून तक्रारी करत आहेत, मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. आज कार चोरी रोखण्यासाठी अनेक तंत्रे आली आहेत, चोरी कमी झाली असली तरी ती पूर्णपणे थांबलेली नाही.


Can Insurance: तुमच्याकडे कार विमा असल्यास काय होईल...


तुमच्याकडे कार विमा (car insurance) असताना तुमची कार चोरीला Car Stolen गेल्यास, विमा कंपनी नुकसान भरपाई देईल. त्यानंतर तुम्ही या पेमेंटमधून कार लोन पेमेंट करू शकता. विमा (car insurance) कंपनीला काही प्रकरणांमध्ये नुकसानीची रक्कम भरण्यासाठी थोडा वेळ किंवा काही महिने लागू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही कार लोनची परतफेड लांबणीवर टाकू नये, कारण याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होईल.


Can Insurance: जर तुमच्याकडे कार विमा नसेल तर काय होईल...


तुमची कार चोरीला गेल्यावर तुमच्याकडे कार विमा (car insurance) नसेल, तर तुम्हाला कार कर्जाची शिल्लक रक्कम भरावी लागेल. शिवाय तुमचा कार विमा संपला असला तरीही, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. त्यामुळे कार विम्याचे  (car insurance) नूतनीकरण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.


जर तुमच्याकडे विमा नसेल तर उर्वरित लोन भरण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमची असेल. यामुळे, प्रत्येकाला सर्वसमावेशक कार विमा घेण्याचा सल्ला दिला जातो, जो अशा कोणत्याही अचानक घडलेल्या प्रसंगापासून तुमचे संरक्षण करतो. तसेच कारचे मूल्यांकन आणि थकित कर्जाची रक्कम यामध्ये तफावत असल्यास, ते गॅप इन्शुरन्सद्वारे कव्हर केले जाऊ शकते. त्यामुळे कार चोरीच्या Car Stolen वेळी तुमच्याकडे गॅप इन्शुरन्स असल्यास, सामान्य विम्यामध्ये थकित कर्जाची संपूर्ण रक्कम समाविष्ट नसली तरीहीतुम्हाला विम्याची रक्कम मिळेल.


इतर ऑटो संबंधित बातमी: 


5 मिनिटांच्या चार्जमध्ये मिळणार 100 किलोमीटरची रेंज; Hyundai ioniq 5 सादर, सिंगल धावणार चार्जवर 631km, अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज


 


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI