एक्स्प्लोर

Ducati Multistrada V4 Pikes Peak बाईक भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

 Ducati Multistrada V4 Pikes Peak: प्रसिद्ध दुचाकी उत्तपादक कंपनी Ducati च्या बाईक जगभरात प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या बाईक आपल्या पॉवरफुल इंजिन आणि लूकसाठी पसंद केल्या जातात.

Ducati Multistrada V4 Pikes Peak: प्रसिद्ध दुचाकी उत्तपादक कंपनी Ducati च्या बाईक जगभरात प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या बाईक आपल्या पॉवरफुल इंजिन आणि लूकसाठी पसंद केल्या जातात. अशातच कंपनीने आपली नवीन बाईक Ducati Multistrada V4 Pikes Peak भारतात लॉन्च केली आहे. भारतात कंपनीने या बाईकची किंमत 31.48 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. क्रॉसओवर सेगमेंटमधील ही कंपनीची सर्वात पॉवरफुल बाईक आहे. ही बाईक लॉन्च केल्यावर डुकाटीने दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, पुणे आणि बंगळुरू येथील डीलरशिपवर बाईकची बुकिंग देखील nसुरू केली आहे. डुकाटी या वर्षी नोव्हेंबरमध्ये या बाईकची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

डिझाइन

डुकाटी मल्टीस्ट्राडा V4 पाईक्स पीकचे बहुतेक कॉम्पोनन्ट कार्बन फायबरपासून बनवलेले आहेत. या बाईकमध्ये कंपनीने Akrapovic titanium कार्बन एक्झॉस्ट, लो स्मोक्ड प्लेक्सी स्क्रीन, Ohlins फ्रंट USD फ्रंट फोर्क्स, V4 लोगोसह दोन टोन ब्लॅक आणि रेड रियर सीट्स दिले आहेत. या नवीन बाईकला कंट्रोल आणि स्पीडठी डिझाइन केले गेले आहे. स्पोर्ट्स बाईकप्रमाणे या बाईकलाही जबरदस्त लीन अँगल मिळतो. बाईकची राइडिंग पोझिशन अधिक स्पोर्टी बनवण्यासाठी, कंपनीने फूट रेस्टची पुनर्रचना केली आहे. ज्यामुळे यात अधिक लीन अँगल देखील मिळतो, तर हँडल बार आधीच खाली ठेवण्यात आला आहे.

इंजिन 

नवीन Multistrada V4 मध्ये 1158cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन V4 GrandTurismo आहे. जे युरो-5 अनुरूप इंजिन आहे. हे इंजिन 125 Nm च्या पीक टॉर्कसह 170 bhp ची पॉवर जनरेट करते. या बाईकची कार्यक्षमता सुधारण्यासाठी इंजिनचे वजन कमी करण्यात आले आहे. या बाईकमध्ये मोठे इंजिन असूनही याचे वजन 66.7 किलो आहे.

फीचर्स 

डुकाटीची ही बाईक अनेक आधुनिक सुरक्षा फीचर्सने सुसज्ज आहे. या बाईकमध्ये पुढील आणि मागील रडार तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हे रडार तंत्रज्ञान अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन तंत्रज्ञानाचे कार्य नियंत्रित करते. बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस देखील देण्यात आला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन मल्टीस्ट्राडा V4 मध्ये 6.5-इंचाचा TFT डिस्प्ले आहे. या डिस्प्लेवर रायडर मॅप आणि नेव्हिगेशन अॅक्सेस करता येते. कनेक्टिव्हिटीसाठी या बाईकमध्ये डुकाटी कनेक्ट सिस्टम देण्यात आली आहे. डुकाटी स्मार्टफोन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून ही बाईक स्मार्टफोनशी जोडली जाऊ शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थितीZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget