एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

पावसात कार-बाईक बंद झाली का? मग गाडी स्टार्ट करण्यासाठी वापर 'या' टिप्स

How To Restart Car-Bike In Monsoon Season: पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी तुंबते. अशातच कार किंवा दुचाकीने प्रवास करणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

How To Restart Car-Bike In Monsoon Season: पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी तुंबते. अशातच कार किंवा दुचाकीने प्रवास करणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पावसामुळे पाणी साचल्याने कार आणि दुचाकीचे नुकसान होण्याची शक्यता सर्वाधिक असते. अशा स्थितीत वाहनाच्या इंजिनमध्ये पाणी जाण्याचाही धोका असतो. त्यामुळे वाहन बंद पडते. तुम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागला असेल, तर या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमची कार-बाईक सुरक्षित ठेवू शकता.

कार-बाईक अर्ध्याहून अधिक पाण्यात पडून बंद पडल्यास करा हे उपाय 

पावसाळ्यात अनेक वेळा रस्ते इतके पाण्याने भरतात की तुमची कार-बाईक अर्ध्याहून अधिक पाण्याखाली जाते. अशा परिस्थितीत इंजिनपर्यंत पाणी पोहोचल्याने वाहन बंद होते. अशावेळी तुमची कार-बाईक पाण्यापासून दूर ढकलून किंवा टोइंग करून पाण्यातून बाहेर काढा. जर कार अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडली असेल आणि बाहेर पडण्याचा मार्ग नसेल तर चारही बाजूंनी दरवाजे उघडा, जेणेकरून कार बुडणार नाही. अशा स्थितीत गाडी सुरू करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. कारण इंजिनमध्ये पाणी जाऊ शकते. कार-बाईक काही तास अशा ठिकाणी ठेवा ज्यातून पाणी बाहेर पडेल. यानंतर कार सुरू करा, जर गाडीचे इंजिन सुरू झाले नाही तर मेकॅनिकला बोलवा.

पाणी साचलेल्या ठिकाणी पहिल्या गीअरमध्ये गाडी चालवा

पावसात कधीही जास्त वेगाने वाहन चालवू नका. जर तुम्हाला इंजिनमध्ये पाणी जाण्यापासून रोखायचे असेल, तर पहिल्या किंवा दुसऱ्या गीअरमध्ये कमी वेगाने गाडी चालवा. त्यामुळे लगेच ब्रेक लावणे सोपे होईल आणि गाडीही सुरक्षित राहते. ब्रेक, क्लच पेडलमधूनही पाणी आत शिरू शकते. हे टाळण्यासाठी गाडी चालवताना हळूच ब्रेक दाबा. त्यामुळे ब्रेक शूमधील पाणी बाहेर पडून ते लवकर सुकते. 

दुचाकीस्वारांनी या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही दुचाकीवरून जात असाल तर सुरक्षिततेसाठी नेहमी हेल्मेट घाला. बाईकची चाके कमी रुंद असतात. त्यामुळे नेहमी मागील ब्रेकचा वापर करा. यामुळे दुचाकी घसरण्याचा धोका कमी होईल. पावसात बाईक थांबली तर लगेच पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. बाईकमधून पाणी निघेपर्यंत थांबा आणि मग ती सुरू करा. जर स्टार्ट किकने बाईक सुरू होत नसेल, तर स्पार्क प्लग तपासा. स्वच्छ सुती कापडाने स्पार्क प्लग साफ केल्यानंतर, त्याला करंट येत आहे का ते तपासा. करंट येत नसेल तर बॅटरी तपासा. बॅटरी फिक्स करूनही बाईक सुरू झाली नाही तर मेकॅनिकला बोलवा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...Maharashtra Exit Poll | झीएआयच्या सर्वेनुसार मराठवाड्यात मविआला 24-29 जागा मिळण्याची शक्यताABP MajhaPune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget