एक्स्प्लोर

7 लाखांच्या बजेटमध्ये खरेदी करा 'या' भन्नाट CNG कार; दमदार परफॉर्मन्ससह मायलेजही आहे उत्तम

CNG Car under 7 Lakh rupees : मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांसाठी 7 लाख रुपयांपर्यंतच्या श्रेणीसह उत्तम मायलेज असलेल्या कारसाठी येथे उत्तम पर्याय आहेत.

CNG Car under 7 Lakh rupees : सामान्यत: ग्राहक कार विकत घेताना आपल्या सुरक्षेचा विचार तर करतातच, पण, कमी पैशांत जास्तीत जास्त सेफ्टी फीचर्स आणि जास्त मायलेज (Mileage) ग्राहकांना हवे असतात. अशातच सीएनजी कारलाही लोकांची मागणी आहे. भारतीय ऑटोमोबाईल (Automobile) मार्केटमध्ये अशा अनेक कार आहेत, ज्या लोकांना 7 लाख रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात. 7 लाख रुपयांपर्यंतच्या या रेंजमध्ये मोठ्या ब्रँडच्या वाहनांच्या नावांचा समावेश आहे. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सकडून उत्तम मायलेज असलेल्या 7 लाख रुपयांच्या रेंजमधील चांगल्या सीएनजी कार बाजारात उपलब्ध आहेत. या कारची संपूर्ण यादी जाणून घेऊयात. 

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)

मारुती सुझुकी वॅगनआर 7 (Maruti Suzuki WagonR) ही कार लाखांपर्यंतच्या रेंजमधील खरेदीदारांसाठी एक चांगली निवड असू शकते. ही कार 1 किलो CNG सह 34.05 किलोमीटरचा मायलेज देते. WagonR च्या LXI CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.45 लाख रुपये आहे आणि VXI CNG व्हेरियंटची किंमत 6.89 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso)

Maruti Suzuki S-Presso च्या LXI CNG व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे. तर त्याच्या VXI CNG व्हेरिएंटची किंमत 6.12 लाख रुपये आहे. ही कार 1 किलो CNG सह 32.73 किलोमीटरचा मायलेज देते.

टाटा टियागो (Tata Tiago)

Tata Motors ची Tata Tiago देखील उत्तम मायलेजसह 7 लाख रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. Tata Tiago XI CNG ची एक्स-शोरूम किंमत 6.60 लाख रुपये आहे. ही कार 26.49 किलोमीटर प्रति किलोग्राम मायलेज देते.

मारुती सुझुकी Eeco (Maruti Suzuki Eeco)

मध्यम रेंजमधील ग्राहकांना मारुती सुझुकीचे इको मॉडेल खरेदी करायलाही आवडते. Maruti Suzuki Eeco चे CNG मायलेज 26.78 किमी प्रति किलो आहे. या कारच्या 5-सीटर एसी व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.58 लाख रुपये आहे. 

मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10)

Maruti Suzuki Alto K10 च्या LXI S-CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.74 लाख रुपये आहे आणि VXI S-CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे. ही कार 1 किलो CNG वर 33.85 किलोमीटर मायलेज देते. तुम्हीसुद्धा कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी चांगले ऑप्शन्स ठरू शकतात. 

महत्त्वाच्या बातम्या :

Tata Motors : Tata Curve आणि Nexon EV चे डार्क एडिशन लवकरच बाजारात येणार; जाणून घ्या काय असेल खास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Saif Ali Khan Stabbing Incident:
"आपको क्या चाहीये?... 1 करोड... जेहच्या रुममध्ये घुसून त्यानं पैसे मागितले"; सैफवर हल्ला झाला 'त्या' रात्री काय-काय घडलं?
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Embed widget