Cheapest Sedan Cars : जर तुमचा सर्वोत्तम आणि स्वस्त सेडान कार खरेदी करण्याचा प्लान असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे, कारण आज आम्ही तुम्हाला भारतातील तीन स्वस्त सेडान कारबद्दल सांगणार आहोत, ज्या उत्तम मायलेज देतात. कमी किमतीत येणाऱ्या टॉप तीन सेडानच्या किमती आणि वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.


मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki)


मारुती सुझुकीची डिझायर ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार आहे. याच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ते 23.26 km/l मायलेज देते. मारुती डिझायरची सुरुवातीची किंमत 6.09 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरियंटमध्ये 9.13 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीनी ही कार चार ट्रिम्ससह आणली आहे. या कारमध्ये तुम्हाला 1197 cc चे 1.2 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल, जे 90 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहेत. दुसरीकडे, त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, डिझायरमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, रिअर पार्किंग सेन्सर, ऑटो एसी, रीअर एसी व्हेंट, क्लाउड आधारित सेवा, हिल होल्ड असिस्ट यांसारखी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.


टाटा टिगोर (Tata Tigor)


टाटा टिगोर सेडान ही या तिन्ही मधील सर्वात स्वस्त कार आहे. Tigor मध्ये, तुम्हाला 1199 cc चे 1.2L पेट्रोल इंजिन मिळते, जे 86 PS पॉवर आणि 113 mm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने याला 6 ट्रिमसह बाजारात आणली आहे. यात इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. दुसरीकडे, त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, आपल्याला Android Auto आणि Apple CarPlay च्या कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रेन सेन्सिंग वायपर, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, कीलेस एंट्री इत्यादी वैशिष्ट्ये मिळतात. त्याच वेळी, कंपनीचा दावा आहे की Tata Tigor 20.3km/l मायलेज देते. त्याची सुरुवातीची किंमत 5.79 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरियंटसाठी 8.41 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.


होंडा अमेझ (Honda Amaze)


कंपनीने Honda Amaze चे तीन ट्रिम बाजारात आणले आहेत. Honda Amaze मध्ये 1498cc चे इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्याय मिळतात. यामध्ये पेट्रोल इंजिनबद्दल बोलायचे झाले तर ते 1.2 लीटर इंजिन आहे, जे 90 PS पॉवर आणि 110 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यासोबत तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. याच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. सेडान पेट्रोलवर 18.6 किमी/ली आणि डिझेलवर 24.7 किमी/ली मायलेज देते. त्याची सुरुवातीची किंमत 6.38 लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटसाठी 11.21 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.


संबंधित बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI