BMW launches first electric Mini Cooper SE in India : जर्मन वाहन निर्माता कंपनी बीएमडब्लूने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक मिनी 3-डोर कूपर एसई लाँच केली आहे. या गाडीची किंमत 47.2 लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. अवघ्या 7.3 सेकंदात ही इलेक्ट्रिक कार 100 किमी पर्यंतच्या वेगाने धावेल. बीएमडब्लूची ही गाडी भारतातील फक्त 9 डिलरकडे उपलब्ध असणार आहे. तेथून तुम्ही ही कार खरेदी करु शकता. मिनी बीएमडब्लू मार्च 2022 पासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. पाहूयात या कारच्या फिचर्सबद्दल जाणून घेऊयात... Mini Cooper SE Launch In India:


7.3 सेकंदात 0-100 किमी –
बीएमडब्लूच्या मिनी 3-डोर कूपर एसई इलेक्ट्रिक कार हवेच्या वेगाने धावते. या गाडीच्या इंजिनमध्ये 184 hp/135 kW आणि 270 Nm चा जास्तीत जास्त टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. ही इलेक्ट्रिक मिनी कार 7.3 सेकंदात 0 ते 100 किमी. वेगाने धावू शकते. यामध्ये 32.6 kWh ती बॅटरी क्षमता आहे. 


एकदा चार्ज केल्यानंतर 270 किमी धावणार – 
बीएमडब्लूची मिनी इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 270 किमीपर्यंत धावते. 


फिचर्स काय आहेत?
बीएमडब्लूच्या मिनी इलेक्ट्रिक मॉडलमध्ये वायरलेस चार्जिंग, एन्हांस्ड ब्लूटूथ मोबाइल कनेक्टिव्हिटी, मल्टीफंक्शनल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले, डायनेमिक स्टेबिलिटी कंट्रोल, क्रॅश सेंसर, एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, रन-फ्लॅट टायर आणि रिअर-व्यू कॅमरा यासारखे फिचर्स आहेत.  


BMW X3 डिझेल भारतात लॉन्च -
बीएमडब्लूने गेल्या आठवड्यात भारतात आपली नवीन X3 xDrive20d SUV चा डिझेल व्हेरियंट लॉन्च केला आहे. ही कार फक्त 7.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास गती प्राप्त करते. याची टॉप स्पीड 213 किमी प्रतितास इतकी आहे. BMW X3 सीरिजमध्ये दोन पेट्रोल कार यापूर्वीच लॉन्च करण्यात आल्या आहेत. BMW X3 xDrive20d 2022 मॉडेलमध्ये मल्टी-फंक्शन स्पोर्ट स्टीयरिंग व्हील, मेमरी फंक्शनसह इलेक्ट्रिक सीट ऍडजस्टमेंट, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, अ‍ॅम्बियंट लाइटिंग आणि थ्री-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. जी BMW जेश्चर कंट्रोलद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. यामध्ये ग्राहकांना वायरलेस अ‍ॅपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो आणि हरमन कार्डन साउंड सिस्टम देखील मिळणार आहे. यात 2022 BMW X3 मध्ये 6 एअरबॅग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहे. या कारची किंमत 65.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. भारतात याची स्पर्धा आगामी लँड रोव्हर (Land Rover), ऑडी (Audi) आणि व्होल्वो (Volvo) कारशी होईल. यामध्ये Audi Q5 आणि Volvo XC60 सारख्या कारचा समावेश आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI