Cars under 6 Lakh on Road : कार घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. यासाठी प्रत्येक व्यक्तीचं बजेट वेगवेगळं असतं. मात्र तुम्हालाही परवडणाऱ्या दरात चांगली कार घ्यायची इच्छा असेल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. देशात दरवर्षी लाखो कार विकल्या जातात. बाजारात मोठ्या संख्येने लहान, मोठ्या महागड्या आणि स्वस्त अशा सर्व प्रकारच्या कार उपलब्ध आहेत. भारतातील बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कार घेणं हे स्वप्न असतं. मध्यमवर्गीय कुटुंब त्यांच्या गरजांसाठी हॅचबॅक कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात कारण त्यांच्या किमती कमी असतात. कार खरेदी करताना काही लोकांचं बजेट मर्यादित असतं. त्यामुळे जर तुमचे बजेटमध्ये कार घेण्याचे फक्त 6 लाख रुपये असेल तर तुम्ही या किमतीत ऑन रोड कार घेण्याचा विचार करत असाल, तर याची यादी खाली दिली आहे.


मारुती अल्टो के 10 (Maruti Alto K10)


Maruti Alto K10 या कारची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे. जर तुम्हाला 6 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची ऑन रोड कार खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी Alto K10 चे VXi AT व्हर्जन सर्वोत्तम असेल. या व्हेरियंटमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. हा या कारच्या टॉप मॉडेलच्या खालचं मॉडेल आहे. Maruti Alto K10 कार 24 किलोमीटर/लीटरपर्यंत (24 kmpl) मायलेज देऊ शकते.


मारुती एस-प्रेसो (Maruti S-Presso)


Maruti S-Presso ही थोडी मोठ्या आकाराची कार आहे. त्याचा VXi Plus व्हेरियंट तुम्हाला सहा लाख रुपयांपर्यंत ऑन-रोड बजेटमध्ये उपलब्ध आहे. हे मॉडेल टॉप मॉडेलचं मधलं व्हेरियंट आहे. या कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन असून ही कार 24 किलोमीटर/लीटर (24 kmpl) मायलेज देते.


रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)


सहा लाख रुपयांच्या बजेटमध्ये, तुम्हाला Renault Kwid कारचं 1.0 L RXT व्हर्जन उपलब्ध आहे. हे या मॉडेलचा मध्यम प्रकार आहे. या कारचं इंजिन 68PS पॉवर आणि 91 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 22 किलोमीटर/लीटर (22 kmpl) पर्यंत मायलेज देते.


महत्त्वाच्या इतर बातम्या



Car loan Information:

Calculate Car Loan EMI