Yamaha Aerox 155 MotoGP Edition: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा मोटर्सने आपल्या Aerox 155 चा  Moto GP Edition भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. कंपनीच्या या नवीन स्कूटरची किंमत 1,41,300 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही स्कूटर 'द कॉल ऑफ द ब्लू' या ब्रँड मोहिमेअंतर्गत लॉन्च केली आहे. ही भारतातील सर्व प्रीमियम ब्लू स्क्वेअर आउटलेटवर उपलब्ध आहे. कंपनीने याआधीही याच लिव्हरी ट्रीटमेंटसह नवीन YZF-R15 लॉन्च केली होती.


फीचर्स 


या नवीन स्कूटरमध्ये कंपनीने एलईडी हेडलाइट आणि टेल लाइटसह एलईडी डीआरएल लाईट आणि टर्न इंडिकेटरही एलईडीमध्ये देण्यात आले आहेत. Aerox 155 ला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस ऑपरेशन, चार्जिंग सॉकेट आणि सिंगल चॅनेल ABS सुरक्षितता आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम देखील मिळते. या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारख्या अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. या स्कूटरच्या दोन्ही बाजूंना 14-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. या नवीन स्कूटरला ब्लूटूथद्वारे यामाहा वाय-कनेक्ट अॅप्लिकेशनशी कनेक्ट केले जाऊ शकते. हे अॅप्लिकेशन स्कूटरचे मायलेज, राइडिंग हिस्ट्री, पार्किंग लोकेशन, बॅटरी लेव्हल आणि मेंटेनन्स अॅलर्टसह विविध सूचना पुरवते. स्कूटरमध्ये 5.5-लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे आणि 25 लीटरची अंडरसिट स्टोरेज ग्राहकांना मिळेल.


इंजिन 


Aerox 155 मध्ये नवीन जनरेशनचे 155cc ब्लू कोअर इंजिन देण्यात आले आहे. जे व्हेरिएबल वाल्व्ह अॅक्ट्युएशनने (VVA) सुसज्ज आहे. हे CVT ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. हे इंजिन लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC, 4-व्हॉल्व्ह इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 8,000 rpm वर 15 bhp ची पॉवर आणि 6,500 rpm वर 13.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. भारतात Aerox 155 ची स्पर्धा Aprilia SXR160 शी होईल. जरी या दोन्ही स्कूटर मॅक्सी-स्कूटर्सच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत, परंतु पॉवर आउटपुट आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत एरोक्स 155 एप्रिलिया एसएक्सआर160 पेक्षा चांगली आहे.


दरम्यान, अलीकडे यामाहाने R15M आणि Yamaha MT-15 V2.0 ला नवीन MotoGP लिव्हरी ट्रीटमेंट देखील दिली आहे. हे मॉडेल्स Aerox 155 सारख्या ब्लू स्क्वेअर आउटलेटवरून देखील खरेदी करता येतील. जिथे Yamaha YZF-R15M किंमत 1,90,900 रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली). तसेच Yamaha MT-15 V2.0 ची किंमत 1,65,400 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI