Electric Bike: आपल्या Vespa स्कूटरसाठी लोकप्रिय असलेली एलएमएल कंपनी भारतात पुन्हा आगमनासाठी सज्ज झाली आहे. या कंपनीचे स्कूटर 1990 च्या दशकात खूप लोकप्रिय तर झालेच, पण ते खूप स्टायलिश ही होते. कंपनी पुन्हा भारतात पदार्पण करणार आहे, मात्र यंदा पेट्रोल नाही तर कंपनी इलेक्ट्रिक वाहन घेऊन येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एलएमएल कंपनी 29 सप्टेंबर 2022 रोजी भारतात तीन इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करणार आहे. LML च्या तीन इलेक्ट्रिक उत्पादनांमध्ये हायपरबाईक, एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि एक परफॉर्मन्स बाईकचा समावेश असेल. कंपनीने गेल्या वर्षीच बाजारात पुनरागमन करण्याची आपली योजना उघड केली होती, परंतु कंपनीने अद्याप या वाहनांबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, एलएमएल इलेक्ट्रिकचे सीईओ योगेश भाटिया 2025 पर्यंत एलएमएलला भारतातील टॉप इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपन्यांपैकी एक बनवण्याचा विचार करत आहेत. कंपनी प्रीमियम इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये  आपली वाहने लॉन्च करेल. जी बाजारात ओला, अथर, सिंपल, टीव्हीएस आणि बजाजच्या इलेक्ट्रिक वाहनांशी स्पर्धा करेल.


एलएमएल इलेक्ट्रिकने त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे तंत्रज्ञान आणि डिझाइन विकसित करण्यासाठी जर्मन इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी eROCKIT ची मदत घेतली आहे. कंपनी भारतात LML च्या उत्पादनांसाठी तांत्रिक सहाय्य आणि व्यासपीठ प्रदान करेल. अशातच  योगेश भाटिया म्हणाले आहेत की, ही उत्पादने केवळ eRockit मधील उत्पादनांचे री-इंजिनिअरिंग आणि भारताच्या रस्त्यांच्या परिस्थितीनुसार विकसित केली जाणार आहेत. कंपनीच्या आगामी उत्पादनांच्या यादीमध्ये, LML पहिल्यांदा ई-हायपरबाईक लॉन्च करेल. जी पेडल-असिस्ट तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. सध्या या बाईकबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. एका रिपोर्टनुसार, जर्मन उत्पादनावर आधारित ही ई-बाईक पूर्ण चार्ज केल्यानंतर 120 किमीची रेंज देऊ शकते. तसेच त्याची इलेक्ट्रिक मोटर 20 bhp पॉवर जनरेट करेल. या बाईकचा कमाल वेग ताशी 90 किमी असू शकतो. ई-हायपरबाईकची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होईल. यानंतर कंपनी ई-स्कूटर लॉन्च करेल आणि ऑगस्ट 2023 पासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल. इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Pro, Ather 450X आणि Simple One इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.


महत्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI