BYD Atto 3 EV Review: स्टायलिश लूक आणि जबरदस्त रेंज, जाणून घ्या कशी आहे नवीन BYD Atto 3 इलेक्ट्रिक कार
BYD Atto 3 EV Review: जगभरात इलेक्ट्रिक कार्ल मोठी मागणी निर्माण झाली आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी कारप्रमाणेच इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही वाढली आहे.
BYD Atto 3 EV Review: जगभरात इलेक्ट्रिक कार्ल मोठी मागणी निर्माण झाली आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी कारप्रमाणेच इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही वाढली आहे. अशातच अनेक वाहन उत्पादक कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहे. यातच चिनी वाहन उत्पदक कंपनी BYD ने आपली नवीन इलेक्ट्रिक कार Atto 3 भारतात लॉन्च केली आहे. ही कंपनीची प्रीमियम कार आहे. भारतीय बाजारपेठेत ही कार MG ZS EV आणि Volvo XC40 शी स्पर्धा करेल. कंपनीची ही कार कशी आहे, याचा लूक, रेंज आणि फीचर्सबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
लूक
आम्ही कारचे बारकाईने निरीक्षण केले. आम्हाला असे दिसून आले की, ही खरोखरच एक प्रीमियम SUV आहे. जी तिच्या किंमत अनुसार योग्य आहे. ही कार स्लीक हेडलॅम्प्ससह खूपच आकर्षक दिसते. तर याच्या बंपरला शार्प कट डिझाइन मिळते. स्किड प्लेट्स आणि क्लॅडिंग सारखे इतर एलिमेंट्स देखील यात दिले गेले आहेत. मागील बाजूस कनेक्टिंग टेल-लॅम्प देण्यात आले आहेत. तसेच यात 18-इंचाचे मोठे व्हील्स देखील देण्यात आले आहेत. BYD Atto 3 चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे - बोल्डर ग्रे, पार्कौर रेड, स्की व्हाइट आणि सर्फ ब्लू.
इंटिरिअर
BYD आपल्या या कारमध्ये पूर्णपणे नवीन इंटिरिअर दिले आहे. याची डिझाइनही उत्कृष्ट आहे. याला फंकी एअरकॉन व्हेंट्ससह E6 सारखी फिरणारी स्क्रीन मिळते. जी लँडस्केपमध्ये किंवा पोर्ट्रेटमध्ये 12.8-इंच पर्यंत फोल्ड होते.
फीचर्स
या नवीन कारमध्ये कंपनीने एअरबॅग्ज, एक पॅनोरामिक सनरूफ, ANFC कार्ड की, वायरलेस चार्जिंग, वन टच इलेक्ट्रिक कंट्रोल टेलगेट, 8-स्पीकर ऑडिओ सिस्टम, आणि व्हॉइस कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच यात एलईडी हेडलँप, एलईडी रिअर लाइट्स, मल्टी-कलर ग्रेडियंट अॅम्बियंट लाइटिंग, पीएम 2.5 एअर फिल्टर, सीएन 95 एअर फिल्टरसह ADAS सिस्टम देखील उपलब्ध आहे.
किती मिळणार रेंज?
BYD ने केलेल्या दाव्यानुसार, ही कार ARAI ने प्रमाणातील केल्याप्रमाणे 521km ची रेंज देण्यास सक्षम आहे. जी अनेक महाग ईव्हीपेक्षा जास्त आहे. यात ब्लेड बॅटरी तंत्रज्ञानासह 60.48kWh बॅटरी पॅक आहे. ही कार फक्त 7.3 सेकंदात 0-100km/h इतका वेग पकडू शकते. ग्राहकांना यात होम चार्जर आणि पोर्टेबल चार्जिंग बॉक्स मिळणार. तसेच ही कार डीसी फास्ट चार्जरलाही सपोर्ट करते.
किंमत
Atto3 मध्ये ग्राहकांना बॅटरीवर 8 वर्षे किंवा 1.6 लाख किमी (जे आधीचे असेल), मोटर कंट्रोलरसाठी 8 वर्षे किंवा 1.5 लाख किमी आणि कारवर 6 वर्षे किंवा 1.5 लाख किमीची वॉरंटी मिळते. कंपनीने या कारची किंमत 33.9 लाख (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. आतापर्यंत 1500 लोकांनी ही कार बुक केली आहे.