BMW Launches New X3 SUV : जर्मन कार कंपनी बीएमडब्ल्यूने (BMW) गुरुवारी भारतात लक्झरी कारच्या X3 नवीन व्हर्जनला एका नव्या रूपात लॉन्च केलं आहे. त्याचबरोबर 'X3 चा डिझेल व्हेरियंट लवकरच लॉन्च करण्यात येईल असेही कंपनीने एका शोमध्ये सांगितले आहे.   BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावह म्हणाले, की "प्रिमियम SUV सेगमेंटमध्ये मॉडेलच्या अद्भूत यशाला कायम ठेवण्यासाठी BMW X3 ची तिसरी जनरेशन आणण्यात आली आहे. जाणून घ्या कारची किंमत, फीचर्स आणि बरंच काही...


या कारची किंमत आणि वैशिष्ये काय आहेत?


X3 xDrive30i SportX Plus या कारच्या ट्रिमची एक्स-शोरूम किंमत 59.90 लाखांपासून सुरू होते. तर, X3 xDrive30i M Sport च्या एक्स-शोरूमची किंमत 65.90 लाख आहे. या कारला नवीन लूकसोबतच BMW X3 मध्ये अनेक मॉर्डन फीचर्स आणि अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये सहा एअरबॅग,  डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल (DSC)आणि अटेंशन असिस्टन्स आहेत. त्याचबरोबर क्रॅश सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग आणि साइड-इम्पॅक्ट प्रोटेक्शनदेखील देण्यात आलं आहे.  


जाणून घ्या या कारच्या इंजिनविषयी 


X3 xDrive30i कारमध्ये दोन लिटरप्रमाणे चार सिलेंडरचे पेट्रोल इंजिन आहे. या कारचा वेग 235 KMPH इतका आहे. या कारचा स्पीड तर कमाल आहेच. पण,  नवीन BMW X3 कार फक्त 6.6 सेकंदात 0 ते 100 कि.मी प्रति तासाचा वेग देण्याची या कारची क्षमता आहे. 


BMW ने बनवली कलर बदलणारी कार


BMW ने कलर बदलणारी कार देखील बनवली आहे. ही इलेक्ट्रिक कार कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2022 मध्ये नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. BMW ने आपल्या सर्व इलेक्ट्रिक कारमध्ये कलर बदलण्यासाठी नाविन्यपूर्ण पेंट स्कीमचा ऑप्शनदेखील दिला आहे. तसेच, एका बटणात तुम्ही कारचा बाहेरील कलर एका झटक्यात बदलू शकता, असेही कंपनीने एका शोमध्ये सांगितले आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI