5G Benefits : सध्याच्या युगात मोबाईल ही एक सुविधा राहिलेली नसून सर्वांचीच गरज झाली आहे. त्यामुळे मोबाईल मध्येही दररोज नवनवीन बदल होऊन अधिक ताकदवर नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी जगभरातील नेटवर्क कंपन्या काम करत आहेत. त्यात आता 5G नेटवर्क बऱ्याच जागी वापरात आले असून भारतातही लवकरच 5G नेटवर्कचा वापर सुरु होईल. पण या नेटवर्कमधून येणारी काही हानिकारक किरणंही मानवी शरीराला धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने त्यासाठी अँटी 5G प्रोडक्ट्स बाजारात आणण्यात आले आहेत. यामध्ये नेकलेस, ब्रेसलेट अशा काही गोष्टींचा समावेश असून या उपकरणांनी मुळे 5G डिव्हाईसमधून उत्सर्जित होणारी हानिकारक किरणं दूर ठेवता येतील असं कंपन्यांचं म्हणणं होत. पण आता हे प्रोडक्ट्सच रेडिओअॅक्टिव्ह असून यातूनच हानिकारक किरणोत्सग्र होत असल्याचं समोर आलं आहे.


न्यूक्लियर सेफ्टी अँड रेडिएशन प्रोटेक्शन (ANVS) यांनी अशा प्रकारच्या 10 प्रोडक्ट्सबद्दल चेतावणी जारी केली आहे. जी उपकरणं अँटी 5G असूनही त्यातूनच हानिकारक किरणं बाहेर येत असल्याने या उत्पादनांचा वापर न करण्याचे आवाहनही ANVS ने केले आहे.  तसंच संबधित उपकरणं सध्या न वापरण्याचे सांगत सध्या ही उपकरणं दूर ठेवून याबाबत पुढील माहिती येईपर्यंत प्रतीक्षा करा, असंही ANVS ने केला आहे.


5G नेटवर्क हानिकारक?


5G नेटवर्क आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही. असं जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) म्हणणं आहे. सध्यातरी 5G मोबाइल नेटवर्क सुरक्षित आहेत आणि विद्यमान 3G आणि 4G सिग्नलपेक्षा अधिक भिन्न नाही असंही समोर आलं आहे. तसंच 5G  मोबाइलमधील किरणोत्सग्र नॉन-आयनीकरण रेडिओ लहरींचा असून यामुळे DNA वर कोणताच हानिकारक परिणाम होत नसल्याचंही समोर आलं आहे.


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha