Toyota Hilux vs Isuzu D Max V-Cross : टोयोटा मोटर या महिन्यात आपला पिकअप ट्रक टोयोटा हिलक्स (Toyota Hilux) लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. याचे बुकिंग देखील सुरू झाले आहे आणि मार्च 2022 पासून त्याची डिलिव्हरी सुरू होणार आहे. टोयोटा हिलक्सची इसुझू डी-मॅक्स व्ही-क्रॉससोबत (Isuzu D Max V-Cross) थेट स्पर्धा होणार आहे. चला तर मग या दोघांमध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया..


आकार


Toyota Hiluxच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, यांची लांबी 5,325 मिमी, रुंदी 1,855 मिमी, उंची 1,815 मिमी आणि व्हीलबेस 3,085 मिमी आहे. याशिवाय, कंपनीने उत्तम ऑफरोडिंगसाठी या पिकअप ट्रकला 217 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे.


दुसरीकडे, Isuzu D-Max V-Cross बद्दल बोलायचे झाल्यास, या पिकअप ट्रकची लांबी 5,295 मिमी, रुंदी 1,860 मिमी आणि उंची 1,840 मिमी आहे आणि कंपनीने त्याचा व्हीलबेस 3,095 मिमी ठेवला आहे. याशिवाय Isuzu ने या पिकअप ट्रकमध्ये 225 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे.


टोयोटा हिलक्स उंच आहे, तर इसुझू डी-मॅक्स व्ही-क्रॉस रुंद आणि उंच आहे. याशिवाय, Isuzu D-Max V-Cross मध्ये लांब व्हीलबेस आणि चांगला ग्राउंड क्लीयरन्स देखील आहे.


इंजिन डिटेल्स


टोयोटा हिलक्स इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, या पिकअप ट्रकमध्ये 2.8-लिटर डिझेल इंजिन वापरले गेले आहे, जे 204 bhp पॉवर आणि 500 ​​Nm टॉर्क प्रदान करेल. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध असेल. यात 2-व्हील ड्राईव्ह आणि 4-व्हील ड्राईव्हचा पर्याय मिळेल.


दुसरीकडे, जर आपण Isuzu D-Max V-Crossच्या इंजिनबद्दल बोललो तर त्यात 1.9-लिटर डिझेल इंजिन वापरले आहे. हे इंजिन 163 bhp पॉवर आणि 360 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेस आणि 2-व्हील ड्राईव्ह व 4-व्हील ड्राईव्हचा पर्याय मिळतो.


फीचर्स हाईलाईट


टोयोटा हिलक्सचे सेफ्टी फीचर्स पाहिल्यास, त्यात 7 एअरबॅग्ज, हिल स्टार्ट-असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ऑटो लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, ट्रॅक्शन कंट्रोल, रिअर पार्किंग कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आहे. एक्सटीरियरला बाय-बीम एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लाईट्स, ऑटोमॅटिक हेडलाईट्स आणि 18-इंच अलॉय व्हील मिळतात.


इंटिरिअर्सला पॉवर ड्रायव्हर सीट, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग आणि 60:40 रिअर स्प्लिट सीट मिळते. कम्फर्ट फीचर्स यादीमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, 6-स्पीकर साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, पुश बटण स्टार्ट-स्टॉप आणि क्रूझ कंट्रोल यांचा समावेश आहे.


इसुझू डी-मॅक्स व्ही-क्रॉसच्या सेफ्टी फीचर्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट असिस्ट, 6 एअरबॅग्ज आणि रियर व्ह्यू कॅमेरा यांचा समावेश आहे. एक्सटीरिअर हाईलाइट्समध्ये बाय-एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेल लाईट आणि 18-इंच अलॉय व्हील समाविष्ट आहेत.


याशिवाय, 6-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, कीलेस एंट्री आणि 60:40 रिअर स्प्लिट सीट हे फीचर्स त्याच्या आतील भागात उपलब्ध आहेत. कम्फर्ट फीचर्समध्ये ऑटोमॅटिक एसी, पुश बटन स्टार्ट-स्टॉप, क्रूझ कंट्रोल आणि 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम समाविष्ट आहे.


किंमत


Toyota Hilux ची किंमत रु. 25 लाख ते 30 लाख दरम्यान असण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ती Isuzu D-Max V-Cross पेक्षा महाग ठरणार आहे. Isuzu ने D-Max Hi-lander नावाचे पिकअपची अधिक परवडणारे व्हर्जन देखील बाजारात आणले आहे, ज्याची किंमत 19.06 लाख रुपये आहे.


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI