5G Phones : अमेरिकेतल्या विमानतळांवर 5 जी इंटरनेट सेवा कालपासून सुरू झाल्यानं विमान सेवेत मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. एअर इंडियाकडून अमेरिका आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या अनेक फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या मतानुसार, 5 जी लहरींमुळे विमानाचं अल्टीमीटर इंजिन आणि ब्रेक्स सिस्टीम्समध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे रनवेवर विमान उतरताना अपघात होण्याची शक्यता आहे. या सूचनेमुळे एअर इंडियानं विमानाच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाप्रमाणे दुबईच्या एमिरेट्स एअरलाईन्सनंही उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतल्या अनेक एअरलाईन्सनाही या निर्णयाचा फटका बसला आहे. अनेक एअरलाईन्स कंपन्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून विमानसेवा रखडण्याची शक्यता असल्याचा इशाराही दिला आहे. 


एअर इंडियाच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करताना 19 जानेवारीला म्हणजेच, आजपासून 5G इंटरनेटमुळे अमेरिका आणि भारतादरम्यानच्या विमान कंपनीत विशेष बदल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यूएस एव्हिएशन रेग्युलेटर, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, 5G मुळे विमानाच्या रेडिओ अल्टिमीटर इंजिन आणि ब्रेक सिस्टममध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. ज्यामुळे विमानाला धावपट्टीवर उतरण्यास समस्या निर्माण होऊ शकते. त्याचवेळी दुबईच्या एमिरेट्स एअरलाईन्सनंही आदल्या दिवशी अमेरिकेतील विविध ठिकाणी जाणारी उड्डाणं रद्द केली आहेत. 



खरं तर, ट्वीट करून याबद्दल माहिती देताना एअर इंडियाने सांगितले की, अमेरिकेत 5G मुळे भारतातील सेवा 19 जानेवारी 2022 रोजी बदलल्या जातील. कंपनीनं पुढे सांगितलं की, याशिवाय विमानाच्या प्रकारातही बदल केले जातील, ज्याबद्दल लवकरच अपडेट शेअर केलं जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो, आजपासून यूएस विमानतळांवर 5G तंत्रज्ञान सुरु होणार आहे, ज्यामुळे फ्लाइट्स प्रभावित होण्याची शक्यता आहे. युनायटेड एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटलं आहे की, अमेरिकन सरकारच्या या योजनेचा एअरलाइनवर गंभीर परिणाम होऊ शकतो.


एअरलाइन्सने बायडन प्रशासनाला पत्र लिहिलं


मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्सने बिडेन प्रशासनाला काही काळ स्थगित करण्याची विनंती केली होती. त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी पत्र लिहून दिला आहे. मात्र, एअरलाइन्सचा हा इशारा बायडेन प्रशासनाने किती गांभीर्याने घेतला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. असं मानलं जाते की, 5G तंत्रज्ञान एअरलाइन्सच्या वारंवारतेमध्ये अडथळे निर्माण करू शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha