5G Network : पुढील वर्षी देशातल्या प्रमुख शहरांना फाईव्ह जी नेटवर्कचं गिफ्ट मिळणार आहे. त्या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुणे शहरांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली, बंगळुरु, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबादसह प्रमुख मेट्रो आणि मोठ्या शहरांत फाईव्ह जी नेटवर्कची सुविधा सुरु होणार आहे. 


मार्च-एप्रिल 2022 मध्ये 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याची सरकारची योजना आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, दूरसंचार क्षेत्रातील नियामक 'ट्राय'कडून राखीव किंमत, बँड योजना, ब्लॉक आकार, स्पेक्ट्रमचे प्रमाण या संदर्भात स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी शिफारशी मागवण्यात आल्या आहेत. तसंच ट्रायनं उद्योग भागधारकांशी या विषयावर सल्लामसलत सुरू केली आहे.


इंडियव एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, 5G च्या नव्या स्पेक्ट्रमचा लिलाव 2022 साली होणार आहे. त्यानंतर 5G नेटवर्क लॉन्च केले जाणार आहे. दरम्यान स्पेक्ट्रमच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर जर स्पेक्ट्रमची किंमत अधिक असेल तर 5G चे प्लान देखील महाग असणार आहे.


भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन वर्षात 100 पेक्षा अधिक 5G स्मार्टफोन लॉन्च झाले आहे. तसेच इतर 5G फोन देखील बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे आता 5G च्या लॉन्चिंगची प्रतीक्षा आहे. स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी देखील आता 4G फोन लॉन्च करणे बंद केले आहे. 


 5G आल्यानंतर शहरे अधिक स्मार्ट होतील. 5G तंत्रज्ञान शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी, शहरे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद होती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिक्षण मिळाले. 5G तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या आणि सोप्या पद्धतीने शिक्षण दिले जाऊ शकते. 5G च्या मदतीने रोगाचे निदान आणि उपचारात मोठी सुधारणा होईल. कृत्रिम तंत्रज्ञानाच्या आधारे रोबोटिक शस्त्रक्रिया करता येईल. 5G च्या आगमनाने टेलिमेडिसिनचा विस्तार होईल. ग्रामीण भागात व्हिडिओच्या माध्यमातून मोठमोठे डॉक्टर रुग्णांशी थेट संपर्क साधून त्यांच्यावर उपचार करू शकतील