Bajaj Bike Sales : देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या दुचाकी वाहन निर्मिती कंपन्यांपैकी एक बजाज ऑटो (Bajaj Bike) ही कंपनी आहे. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये बाईक्सची जबरदस्त विक्री केली आहे. या वर्षी बजाज कंपनीने देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करण्यात आलेल्या बाईकची संख्या  2,74,154 इतकी आहे.  तर एप्रिल 2022 मध्ये कंपनीने 2,68,284 इतक्या बाईक्सची विक्री केली होती. या दरम्यान बजाज पल्सर बाईकची सर्वाधिक विक्री  झाली आहे. अलीकडेच कंपनीने या मॉडेलमधील  नवीन व्हर्जनची बाईक लाँच केली होती. याशिवाय कंपनीच्या इतर मॉडेल्सच्या विक्रीमध्ये 1027 टक्के इतकी वाढ झाल्याचं दिसून आले आहे. एप्रिल 2023 मध्ये कंपनीने कोणकोणत्या मॉडल्सच्या बाईक्सची सर्वाधिक विक्री केली आहे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया...


कंपनीने एप्रिल  2023 मध्ये  बजाज  पल्सरच्या सिरीजमधील  1,15,371 इतक्या बाईक्सची विक्री केली आहे.  तर एप्रिल 2022 मध्ये या बाईक्सच्या 46,040 बाईक्सची विक्री केली होती. ज्यामध्ये 150 टक्के वाढ झाली होती. या सिरीजमधील बजाज पल्सर 125cc मॉडेल्सची सर्वाधिक विक्री  झाली आहे. 


बजाज प्लॅटिना 


एप्रिल 2023 मध्ये बजाज प्लॅटिनाच्या  46,322 इतक्या बाईक्सची विक्री झाली होती, जी एप्रिल 2022 मध्ये विक्री करण्यात आलेल्या 39,316  बाईक्सच्या तुलनेत 17.82 टक्के इतकी जास्त आहे. तर बजाजच्या सीटी 100 मॉडेलची 6,973 इतक्या बाईक्सची विक्री झाली, जी 26.83 टक्क्यांची वाढ आहे. याच सिरीजमधील चौथ्या क्रमांकांवरील सर्वात जास्त चेतक इलेक्ट्रिक  स्कूटरच्या मॉडेल्समधील 4,546 इतक्या बाईक्सची विक्री झाली आहे.


बजाज अवेंजर बाईक 


बजाज अवेंजर मॉडेल्सच्या विक्रीमध्ये 1027.27  टक्के इतकी जबरदस्त वाढ नोंदवली आहे. एप्रिल 2022 मध्ये या मॉडेलच्या फक्त 176 बाईक्सची विक्री झाली होती. एप्रिल 2023 मध्ये याच मॉडेलच्या 1,984  इतक्या बाईक्सची विक्री झाली होती. अलीकडेच बजाज अवेंजरने 220 स्ट्रीट या बाईकला पुन्हा लाँच केलं आहे.  तर अवेंजर 160 स्ट्रीट आणि 220 क्रूज याआधीपासूनच मार्केटमध्ये  विक्रीसाठी उपलब्ध आहे. 


इतर बातम्या बातम्या :     


Bajaj Pulsar 150: Pulsar 150 चा प्रवास संपला आहे, बजाजने सर्वात लोकप्रिय बाईकचे उत्पादन केले बंद


Pulsar P150: बजाजने नवीन Pulsar P150 बाईक भारत लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


Bajaj Pulsar N150 : नवीन पल्सर N150 लवकरच भारतात लॉन्च होणार; यामाहा FZ FI ला देणार टक्कर


Bajaj Pletina BS6: 'मायलेज किंग' अपडेटेड अवतारात लॉन्च, रोजच्या प्रवासासाठी बेस्ट आहे 'ही' बाईक


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI