Bajaj Pulsar P150: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोने आपल्या पल्सर सीरिजची नवीन बाईक P 150 बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. ही 150cc सेगमेंटमधील बाईक असून कंपनीने याला Pulsar P150 असे नाव दिले आहे. Pulsar P150 सिंगल-डिस्क आणि ट्विन-डिस्क अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकच्या सिंगल डिस्क व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.16 लाख रुपये आहे. तर याच्या ट्विन-डिस्क व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.19 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही बाईक एबोनी ब्लॅक रेड, एबोनी ब्लॅक ब्लू, कॅरिबियन ब्लू, एबोनी ब्लॅक व्हाईट आणि रेसिंग रेड अशा एकूण 5 कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
बजाज पल्सर P150 च्या सिंगल-डिस्क प्रकाराला सिंगल-पीस सीटसह अधिक उपराईट पोझिशन मिळते. तर त्याच्या ट्विन-डिस्क व्हेरियंटला स्प्लिट-सीट सेटअप आणि स्पोर्टियर रायडिंग पोझिशन मिळते. पल्सर सिरींजमधील P150 बाईकला नवा लुक देण्यात आला आहे. ही एक स्पोर्टी आणि वजनाने हलकी बाईक आहे. या बाईकला एलईडी लाइटिंगसह मस्क्यूलर इंधन टाकी देखील मिळते. ही बाईक 790mm उंचीची आहे. म्हणजे जवळजवळ सामान्य उंचीचे लोक ती आरामात चालवू शकतात. यासोबतच यामध्ये एक इन्फिनिटी डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. ज्यामध्ये घड्याळ, इंधन अर्थव्यवस्था, गियर इंडिकेटर, डीटीई सारखे तपशील उपलब्ध आहेत. तसेच यात एक यूएसबी सॉकेट चार्जिंग पॉइंट देखील उपलब्ध आहे.
इंजिन
नवीन Pulsar P150 मध्ये 149.68 cc इंजिन देण्यात आले आहे. जे 8,500 rpm वर 14.5 PS पॉवर आणि 6,000 rpm वर 13.5 Nm टॉर्क जनरेट करते. यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक आहेत. बाईक वजनाने हलकी असण्यासोबतच सुधारित NVH लेव्हल्ससह देखील येते. दरम्यान, नवीन Pulsar P150 बाईक भारतीय बाजारात Yamaha FZ S FI शी स्पर्धा करेल. ही एक स्ट्रीट बाईक आहे. याची पारंभीक किंमत 1,21,979 रुपये आहे. ही बाईक 149cc BS6 इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 12.2 bhp पॉवर आणि 13.3 Nm टॉर्क निर्माण करते. यामाहा FZ S FI समोर आणि मागील दोन्ही डिस्क ब्रेकसह अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टमसह येते. बाईकचे वजन 135 किलोग्रॅम आहे आणि याची इंधन टाकी क्षमता 13 लीटर आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI