Bajaj Pulsar N150 : प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज (Bajaj) लवकरच भारतात आपली नवीन बाईक Pulsar N150 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सध्या या नवीन बाईकच्या स्पेसिफिकेशनबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.    मात्र, या बाईकला अनेकदा टेस्टिंगच्या दरम्यान स्पॉट करण्यात आले आहे. यावरून असे दिसून येते की, लवकरच या बाईकची लॉन्चिंग होणार आहे. 


बजाज पल्सर N150 लूक कसा असेल? 


या नव्या बाईकमध्ये 'वुल्फ-आयड' एलईडी डीआरएल आणि नवीन डिझाईनचा प्रोजेक्टर हेडलॅम्प दिला जाऊ शकतो. फ्यूल टैंक एक्सटेंशन डिझाईन आणि इतर लूक पल्सर LS135 प्रमाणेच दिसू शकतो. या बाईकला अलॉय व्हीलसह कमी रुंद टायर दिले जाऊ शकतात. ही नवीन बाईक बजाज पल्सर 250 च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. 


इंजिन कसे असेल?


कंपनीने नवीन बजाज पल्सर 150cc बद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु, त्यात नवीन 150cc किंवा 180cc एअर-कूल्ड इंजिन दिसू शकते. सध्या, बाईकच्या व्हर्जनमध्ये 14 पीएस पॉवर आणि 13.25 एनएम टॉर्क मिळतो आणि नवीन इंजिन अधिक पॉवरफुल असण्याची शक्यता आहे. या बाईकमध्ये रियर ड्रम ब्रेक उपलब्ध आहे.  


किती खर्च येईल?


नवीन पल्सर 150cc बाईकच्या किमती पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये (अंदाजे) असू शकते, जी सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त आहे.


कोणाशी स्पर्धा करणार?


नवीन पल्सर 150cc बाईक भारतीय बाजारपेठेत Yamaha FZ FI शी स्पर्धा करेल. ही एक स्ट्रीट बाईक आहे जी 1,13,636 रूपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. हे फक्त 1 प्रकार आणि 2 कलरमध्ये उपलब्ध आहे. Yamaha FZ FI मध्ये 149cc BS6 इंजिन आहे जे 12.2 bhp पॉवर आणि 13.3 Nm टॉर्क जनरेट करते. यामाहा FZ FI समोर आणि मागील दोन्ही डिस्क ब्रेकसह अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टमसह येते. या FZ FI बाईकचे कर्ब वेट 135 kg आहे आणि तिची इंधन टाकी क्षमता 13 लीटर आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Bike Comparison : TVS Raider की Bajaj Pulsar 125 कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वात भारी? वाचा A to Z माहिती


Car loan Information:

Calculate Car Loan EMI