Automatic Cars Under 10 Lakhs : भारतीय ऑटोमोबाईल बाजार जगातील सर्वात मोठ्या वाहन बाजारांपैकी एक आहे. येथे लोक विशेषतः कारची किंमत लक्षात घेऊन वाहने खरेदी करतात. या मोठ्या बाजारपेठेत एंट्री-लेव्हल, सब-कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट मॉडेल्सना जास्त मागणी आहे. आजकाल लोक ड्रायव्हिंग करताना अधिक आरामदायी अनुभव मिळण्याची अपेक्षा करतात. म्हणूनच त्यांना मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारपेक्षा ऑटोमॅटिक कार अधिक आवडतात. परंतु, त्यांची किंमत मॅन्युअल कारपेक्षा थोडी जास्त आहे. जर तुम्हालाही ऑटोमॅटिक कार (Automatic Car) हवी असेल आणि तुमचे बजेट 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 ऑटोमॅटिक कार्सबद्दल सांगणार आहोत, चला तर मग या कारसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) :


देशातील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक, मारुती सुझुकी स्विफ्ट 1.2L पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन्ससह ऑफर केली जाते. ही कार 23.2 kmpl ते 23.76 kmpl मायलेज देऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.90 लाख ते 8.77 लाख रुपये आहे. 


टाटा पंच (Tata Punch) :


भारतीय कंपनी टाटा मोटर्सची पंच (Tata Punch) ही एक मायक्रो-एसयूव्ही आहे, ज्यामध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे. जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ही कार 18.82 kmpl ते 18.97 kmpl मायलेज देते. या मिनी एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 5.64 लाख ते 8.98 लाख रुपये आहे.  


टाटा टियागो (Tata Tiago) :


टाटा मोटर्सच्या या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारमध्ये 1.2-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे एक्स-शोरूममध्ये 5.19 लाख ते 7.64 लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे.


मारुती बलेनो (Maruti Baleno) :


मारुती बलेनो ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंट कार आहे. कंपनी नेक्सा डीलरशिपद्वारे ही कार विकते. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 6.14 लाख ते 9.66 लाख रुपये आहे आणि ते 19.56 kmpl ते 23.87 kmpl मायलेज देते.  


निसान मॅग्नाइट (Nissan Magnite) :


निसान मॅग्नाइट 1.0-लिटर इंजिनद्वारे समर्थित आहे आणि एक आकर्षक लूक आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह येते. बाजारात एकूण 23 प्रकार उपलब्ध आहेत. ही SUV कार मॅन्युअल गिअरबॉक्स आणि CVT ट्रान्समिशनच्या पर्यायात येते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.76 लाख ते 10.15 लाख रुपये आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI