Hyundai Venue N-Line: Hyundai ची नवीन कार Hyundai Venue N-Line येत्या काही दिवसात लॉन्च केली जाऊ शकते. Hyundai कडून N-Line रेंजचे हे प्रमुख उत्पादन आहे. जे i20 कार सिरीजनंतर बाजारात येईल. या कारचा लूक स्पोर्टी असून सध्या विकल्या जाणाऱ्या व्हेन्यूपेक्षा थोडा वेगळा असेल. यात खास अलॉय व्हील्स मिळणार असून कारचा रंग आकर्षक असेल. DCT आणि iMT व्हर्जन 1.0 टर्बो पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. कंपनी यात 1.2L पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन पर्याय देऊ शकते.


N-Line Venue मध्ये नवीन डिझाइन एलिमेंट्स जोडले गेले आहेत. याच्या इंटीरियरमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. सीटिंग अर्जमेंट्स सध्या i20 N-Line वर असलेल्या काहीशी समान असेल. कंपनीला स्टिअरिंगला स्पोर्टी लूक द्यायचा आहे, जेणेकरून ड्रायव्हर्सना ते स्पोर्टी एसयूव्ही चालवत असल्याचे पूर्णपणे जाणवू शकेल. कंपनीने याच्या सस्पेंशनवरही बरेच काम केले आहे.


Hyundai आपल्या N-line सिरीजवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. याचे कारण म्हणजे कंपनीला या रेंजमधील इतर गाड्यांशी स्पर्धा करायची गरज नाही आहे. याच दरम्यान i20 N-Line मध्ये लोकांनी खूप रस दाखवला आहे. कंपनी सध्या विकल्या जाणार्‍या N-Line ला प्राधान्य देत आहे. कोविड नंतर सध्या विकल्या जात असलेल्या Venue  एन-लाइनच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. 


कंपनीने आपल्या या आगामी कारची किंमत जाहीर केलेली नाही. तथापि, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की Hyundai Venue N-Line सीरीज 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. तसेच सणासुदीचा हंगाम येण्यापूर्वी ही कार लॉन्च केली जाऊ शकते. जेणेकरून ही कार लोकांना आकर्षित करू शकेल.


दरम्यान, कंपनीने जूनमध्ये आपली नवीन Hyundai Venue फेसलिफ्ट लॉन्च केली होती. पहिल्यांदा Hyundai Venue भारतात मे 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. हा तो काळ होता जेव्हा कॉम्पॅक्ट एसयूव्ही ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक होती. तेव्हापासून कॉम्पॅक्ट SUV मार्केट झेप घेत वाढले आहे आणि Hyundai Venue ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Hyundai कारपैकी एक बनली आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक कॉम्पॅक्ट एसयूव्ही विक्रीसाठी असल्या तरी Hyundai Venue ने आपली पकड कायम ठेवली आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI