Mahindra XUV.e9 Review: भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्राने लंडनमधील एका मेगा इव्हेंटमध्ये आपल्या आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. यातच कंपनीच्या नवीन XUV.e9 आणि XUV.e8 या आधुनिक इलेक्ट्रिक कारही कंपनीने पहिल्यांदाच सादर केल्या आहेत. या कार विना पेट्रेल आणि डिझेलवर धावणाऱ्या XUV 700 ची SUV कूप व्हर्जन आहे. एका खास डिझाइनमध्ये सादर करण्यात आलेल्या XUV.e9 चा फक्त इलेक्ट्रिक व्हर्जन कंपनी बाजारात आणणार आहे. महिंद्राच्या म्हणण्यानुसार या इलेक्ट्रिक कारची रचना आधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक कार XUV 700 पेक्षा मोठी आणि लांब आहे.  ज्याची लांबी 4,790 मिमी, रुंदी 1,905 मिमी आणि उंची 1,690 मिमी आहे. याच्या समोरील बाजूस असलेला मोठा C आकाराचा हेडलॅम्प याच्या लुकमध्ये भर घालतो. 


XUV.e9 लूक


नवीन महिंद्राची ग्रील खूपच आकर्षक आहे. याचा लोगो XUV.e रेंजमध्ये देण्यात आला आहे. या कारच्या रूफच्या डिझाइनसह एलईडी टेल-लॅम्प आणि मागील बाजू देखील बदलण्यात आल्या आहेत. ईव्हीला मागील बंपरच्या खाली एक स्मूथ ब्लॅक स्पॉटसह चांगला ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. XUV.e9 इंग्लो EV प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येईल.  XUV.e9 ही 5-सीटर कार असेल, तर XUV.e8 ला 3-रो सीट अरेंजमेंट मिळेल.


इंटीरियर 


या कारचे इंटीरियर XUV पेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. ज्यामध्ये तीन 12.3-इंचाचे डिस्प्ले आहेत. ज्यात मोठ्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्लेचा समावेश आहे. उर्वरित डॅशबोर्ड लेआउट, बाकी सर्व काही XUV 700 सारखेच आहे. ज्यात तळाशी असलेल्या रोटरी नॉबचा समावेश आहे. कॉन्सेप्ट कारला टू-स्पोक स्टीयरिंग व्हील देखील मिळते.


या इलेक्ट्रिक कारमध्ये सिंगल मोटर/रीअर ड्राइव्ह लेआउट मॉडेल आणि ड्युअल मोटर/AWD लेआउटसह 400 bhp पॉवर जनरेट करण्यासाठी 80 kWh बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे. XUV.e9 आणि इतर महिंद्रा इलेक्ट्रिक SUV वर रीजनरेटिव्ह ब्रेकिंग देखील कस्टमाइझ केले जाऊ शकते.


कधी लॉन्च होणार कार


कार V2L चार्जिंग सारख्या प्रीमियम फीचर्स ऑफरसह येईल, अशी अपेक्षा आहे. ज्यामध्ये कार इतर इलेक्ट्रिकल उपकरणे आणि इतर ईव्ही चार्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते. तसेच ADAS तंत्रज्ञानासोबत ऑगमेंटेड डिस्प्ले एचयूडीचाही यात समावेश करण्यात आला आहे. ही कार 2024 वर्षाअखेरीस किंवा 2025 च्या सुरुवातीला कंपनी लॉन्च करू शकते. 


 


महत्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI