Upcoming Cars : नवीन कार घेण्याचा विचार करत आहात? जाणून घ्या लवकरच लॉन्च होणार्या या गाड्या
Upcoming Cars : सणासुदीच्या काळात तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या आगामी मॉडेल्सवरही एक नजर टाका
Upcoming Cars : सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अनेक एसयूव्ही (SUV) कार लॉन्च झाल्या आहेत. यामध्ये Hyundai Venue N Line, Mahindra XUV400 आणि Toyota Urban Cruiser Hyryder सारख्या कारचा समावेश आहे. या वाहनांव्यतिरिक्त, अजून बरीच मॉडेल्स आहेत जी लॉन्च व्हायची आहेत. त्यामुळे या सणासुदीच्या काळात तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या आगामी मॉडेल्सवरही एक नजर टाका
सणासुदीच्या काळात तुम्हीही कार घेण्याचा विचार करताय?
सणासुदीच्या काळात वाहन निर्मातेही चांगल्या सवलती देत आहेत. अशा स्थितीत, जर तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल, तसेच कारची अपडेटेड व्हर्जन मिळवू इच्छित असाल. त्यासाठी थोडी वाट पाहणे योग्य ठरेल.
मारुती wtb
ही कार मारुतीच्या बलेनोवर आधारित एसयूव्ही कार असेल. जे ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर केले जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये उत्तम इंजिन पर्यायांसह प्रीमियम फीचर्स दिले जाऊ शकतात. रिपोर्टनुसार, मारुती YTB मध्ये 1.0 लीटर बूस्टरजेट माइल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिनसह 1.2 लीटर NA पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. या SUV कारची अपेक्षित किंमत सुमारे 8 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली जाऊ शकते.
मारुती सुझुकी स्विफ्ट
VTB व्यतिरिक्त, मारुती सुझुकी लवकरच त्याच्या स्विफ्टचे अपडेटेड व्हर्जन सादर करू शकते. ही कार देशांतर्गत ऑटोमोबाईल बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हॅचबॅक कारपैकी एक आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला ही कार विक्रीसाठी देऊ शकते. नवीन स्विफ्टमध्ये बाह्य शैली, नवीन केबिन आणि अधिक पॉवरट्रेन पर्यायांमध्ये काही बदल देखील मिळू शकतात. त्याच वेळी, त्याची अंदाजे किंमत 6-7 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली जाऊ शकते.
Hyundai Grand i10 Nios फेसलिफ्ट
Hyundai आपल्या हॅचबॅक कार Grand i10 Nios ची अपडेटेड आवृत्ती आणू शकते. ही कार कंपनीच्या सर्वात स्वस्त कारपैकी एक आहे. या कारच्या फेसलिफ्ट व्हेरियंटच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल अपेक्षित नाहीत. परंतु कंपनी 2023 च्या पहिल्या सहामाहीत त्याच्या डिझाइनमध्ये काही बदलांसह नवीन वैशिष्ट्यांसह एक अद्ययावत केबिन प्रदान करून लॉन्च करू शकते. कंपनी या कारची किंमत 5 ते 6 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवू शकते.
महिंद्रा बोलेरो निओ प्लस
महिंद्राची ही कार 2023 च्या सुरुवातीला सादर केली जाऊ शकते. बोलेरो कार ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. कंपनी ही कार सीटिंग लेआउट आणि पॉवरट्रेनच्या अधिक पर्यायांसह देऊ शकते. तथापि, बोलेरो निओ प्लस त्याच 2.2L mHawk डिझेल इंजिनद्वारे चालविले जाईल. ज्याचा वापर थारमध्ये होतो. परंतु ग्राहक त्यांच्या सोयीनुसार 7- आणि 9-सीट लेआउट निवडण्यास सक्षम असतील. त्याच वेळी, त्याचा आकार देखील बोलेरो निओपेक्षा थोडा जास्त असेल. या कारची अपेक्षित किंमत 10-12 लाखांच्या आसपास असू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या
'या' आहेत देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या 7 सीटर कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स