(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Helmet Airbag: आता हेल्मेटमध्येही मिळणार 'एअरबॅग', अपघाताच्या वेळी बनेल सुरक्षा कवच
Helmet Airbag: रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक (Helmet Compulsory In Maharashtra) आहे. यामुळे चालकाला प्रवास करताना सुरक्षितता मिळते आणि अपघात झाल्यास गंभीर इजा टळते.
Helmet Airbag: रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक (Helmet Compulsory In Maharashtra) आहे. यामुळे चालकाला प्रवास करताना सुरक्षितता मिळते आणि अपघात झाल्यास गंभीर इजा टळते. अशातच आता दुचाकी चालकांच्या सुरक्षेत आणखी एका नव्या गोष्टीची भर पडणार आहे. आता हेल्मेटमध्ये एअरबॅगही (Helmet Airbag) मिळणार आहेत. जे आतापर्यंत फक्त चारचाकी वाहनांमध्ये (Four Wheeler) मिळत होते. इटालियन कंपनी एरोहने (AIROH) या नवीन सुरक्षा तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. यामुळे दुचाकीस्वाराला अधिक सुरक्षितता मिळणार आहे.
Airbag Helmet : एअरबॅग हेल्मेट विशेष का आहे?
एरोहने एअरबॅग (Airbag Helmet) असलेल्या हेल्मेटला 'एअरहेड' असे नाव दिले आहे. या हेल्मेटचे (Bike Helmet) वैशिष्ट्य म्हणजे अपघात झाल्यास ही एअरबॅग दुचाकीस्वाराच्या डोक्यावर इजा होण्यापासून वाचवते. या हेल्मेटचे डिझाइन (Bike Helmet) अशा प्रकारे करण्यात आली आहे की, एअरबॅग (Airbag Helmet) उघडल्यावरही डोके फिरवण्यास पुरेशी जागा दुचाकीस्वाराला मिळते. ज्यामुळे त्याला दबाव जाणवत नाही.
India Accident Death Rate 2021 : देशात अपघाताचे आकडे कमी होण्यास होईल मदत
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये 1,55,622 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. मृत्यूचे हे आकडे कमी करण्यासाठी या हेल्मेटचा (Bike Helmet) वापर खूप प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे रायडरचे डोके फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूपच कमी होते. या हेल्मेट सध्या तयार केले जात असून, पुढील वर्षभरात ते जगभराह भारतातही विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
Airbag Helmet : हेल्मेटमध्ये या गोष्टी असायलाच हव्यात
कोणत्याही बाईक हेल्मेटला (Bike Helmet) सेफ्टी रेटिंग असणं खूप गरजेचं आहे. सध्या देशात इकॉनॉमिक कमिशन ऑफ युरोप (ECE), सेफ्टी हेल्मेट असेसमेंट अँड रेटिंग प्रोग्राम (SHARP), परिवहन विभाग (DOT), ISI मानक आणि स्नेल मेमोरियल फाऊंडेशन (SNELL) सारख्या मानकांसह हेल्मेट विकले जातात. यापैकी सर्वात सुरक्षित मॉडेल हे DOT मार्क असलेले मानले जातात. हे मुख्यतः 650cc किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या बाईकसाठी वापरले जातात.
इतर महत्वाच्या बातम्या:
Viral Video : आरपीएफ जवान बनले देवदूत, रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकलेल्या मुलीला दिले जीवनदान