Kia Carnival Car: यावर्षीच्या ऑटो एक्सपोमध्ये अनेक कंपनीच्या नवीन कार सादर करण्यात आल्या. त्याचप्रमाणे Kia Carnival Car देखील सादर करण्यात आली होती. Kia Motors सध्या त्याच्या कार्निवल MPV (Kia Carnival Car) ची चौथ्या जनरेशनची विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. या कारला कंपनीने 2020 मध्ये लॉन्च केलं होतं. मात्र, अजूनही या कारचे थर्ड जनरेशन मॉडेल भारतात विकले जाते. मात्र, चौथ्या जनरेशनचे मॉडेल लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. कारण कंपनीने 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये देखील या कारला सादर केले होते. या कारच्या पुढील जनरेशनचे मॉडेल परदेशात येण्यापूर्वीच या कारचे चौथ्या जनरेशनचे मॉडेल भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.


EV9 ची डिझाईन कशी असेल? 


कार्निव्हल ही कार देशातील सर्वात आकर्षक दिसणार्‍या MPV (Multi-Purpose Vehicles)  पैकी एक आहे. लवकरच कार्निव्हल कंपनी जागतिक बाजारपेठेत नवीन जनरेशन अपडेट करणार आहे. 2024 किआ कार्निवल फेसलिफ्टच्या स्पाय चित्रांवरून असे दिसून येते की, एमपीव्ही पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक असणार आहे. नवीन जनरेशन किआ कार्निव्हलला आकर्षक डिझाईन देण्याचा प्रयत्न यापूर्वीच करण्यात आला आहे. किआ कार्निवल फेसलिफ्टची दक्षिण कोरियामध्ये टेस्टिंग करण्यात आली आहे आणि लीक झालेल्या फोटोंवरून असे दिसून येते की कार्निव्हल कारचं डिझाइन Kia च्या EV9 कन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV शी प्रेरित आहे. 


कसा असेल लूक? (Kia Carnival Car Look) :


कार्निव्हलमधील आउटगोईंग मॉडेलमध्ये क्रिस-क्रॉस पॅटर्नसह मोठी ग्रील देण्यात आली आहे. यामध्ये लो बीम असलेल्या क्लासिक हेडलाइट्सच्या जागी एलईडी पॅटर्न देण्यात आला आहे. बंपरच्या खालच्या बाजूला फॉग लॅम्पसह, सी-शेप पॅटर्न देण्यात आला आहे.


इंजिन कसे असेल? (Kia Carnival Car Engine) :


नवीन कार्निव्हल कारमध्ये अनेक फिचर्सच्या सुविधेबरोबरच जास्त आरामदायी केबिन पाहायला मिळू शकते. Kia कार्निवल फेसलिफ्टमध्ये आउटगोइंग मॉडेलसारखेच इंजिन दिसू शकते. जे 2.0L 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनवर आधारित आहे. त्याच्या USA विशिष्ट मॉडेलला 3.5L V6 पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळतो. भारतासह इतर काही बाजारपेठांमध्ये, याला एकमेव 2.2L डिझेल इंजिन पर्याय मिळतो, जो 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरसह ऑफर केला जातो. ज्यामध्ये 200 bhp/ 440 Nm आउटपुट उपलब्ध आहे. हेच इंजिन भारतातील चौथ्या जनरेशनमधील कार्निव्हलमध्येही पाहायला मिळेल.


महत्त्वाच्या बातम्या : 


New Honda Activa Launched: लाडकी Activa आली; एच-स्मार्ट तंत्रज्ञानाने आहे सुसज्ज; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI