एक्स्प्लोर
Advertisement
स्ट्रेचर न मिळाल्याने लिफ्टजवळच प्रसुती, जमिनीवर पडल्याने बाळ दगावलं
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्ट्रेचर न मिळाल्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्ट्रेचर न मिळाल्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात स्ट्रेचर नसल्यामुळे गर्भवतीला चालत नेत असताना लिफ्टच्या दरवाज्यातच महिलेची प्रसुती झाली. पसुतीनंतर बाळ जमिनीवर पडून दगावण्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सोनाली खटमोडे असे या गर्भवतीचे नाव आहे. त्या माहेरी बाळंतपण करण्यासाठी आल्या होत्या. काल रात्री 1 च्या सुमारास सोनाली यांना प्रसुतीकळा सुरु झाल्या. प्रसुतीकळा सुरु झाल्यानंतर त्यांची आई आणि नवऱ्याने त्यांना घाटी रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात स्ट्रेचर नसल्याने त्यांना चालतच रुग्णालयाच्या लिफ्टपर्यंत जावे लागले.
सोनाली चालत कशाबशा लिफ्टपर्यंत पोहोचल्या. पंरतु लिफ्टच्या दरवाज्यातच त्यांची प्रसुती झाली. प्रसुतीनंतर त्यांचं बाळ जमिनीवर पडलं आणि त्यानंतर बाळाचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा या बाळाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
घाटी रुग्णालयात घडलेल्या प्रकरणाची माहिती घेत आहे. याप्रकरणी चौकशी करणार असून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. ही घटना दुर्देवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेl यासाठी सर्व रुग्णालयांची पाहणी करणार आहे : एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement