एक्स्प्लोर

मोठी बातमी! काळेंचा 'विक्रम'! मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजयी चौकार

Marathwada Teacher constituency Viram kale wins :  राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजयाचा गुलाल उधळला आहे. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Marathwada Teacher constituency Viram kale wins : मराठवाड्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा अंतिम निकाल हाती आला आहे. ज्यात राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे (vikram kale) यांनी चौथ्यांदा विजयाचा गुलाल उधळला आहे. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील (Kiran patil)  यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विक्रम काळे यांना 23 हजार 580 मतं मिळाली असून, किरण पाटलांना 16 हजार 643 मते  मिळाली आहे. ज्यामुळे विक्रम काळे यांचा 6 हजार 937 मतांनी विजय झाला आहे. 

सकाळी आठ वाजेपासून मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती. मात्र पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला कोटा पूर्ण करता आला नसल्याने, दुसऱ्या पसंतीची मतमोजणी करण्यात आली. दरम्यान दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत विक्रम काळे यांनी सर्वाधिक 23 हजार 580 मत मिळवल्याने त्यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 18 वर्षांपासून मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या विक्रम काळे यांचा हा सलग चौथा विजय आहे.

महाविकास आघाडीकडून जल्लोष

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच विक्रम काळे यांनी आघाडी घेतली होती. पुढे आघाडी मतांचा आकडा वाढत गेला. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात देखील काळे यांच्या मताची आघाडी कायम होती. त्यामुळे निकालापूर्वीच महाविकास आघाडीकडून जल्लोष साजरा करण्यात आला. ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी विक्रम काळे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काळे यांच्या समर्थकांकडून गुलाल उधळत विजय साजरा करण्यात आला. तर काही कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत आनंद साजरा केला.

विक्रम काळे यांचा चौथ्यांदा विजय!

कधीकाळी मराठवाडा शिक्षक संघाच्या ताब्यात असणाऱ्या या मतदारसंघात 2004 मध्ये राष्ट्रवादीचे वसंत काळे आपल्या ताब्यात घेत, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. तेव्हापासून हा मतदारसंघ कायम राष्ट्रवादीकडेच राहिला आहे. तर 6 जानेवारी 2010 ते 5  डिसेंबर 2016 पर्यंत विक्रम काळे या मतदारसंघात विजयी होऊन महाराष्ट्र विधान परिषदेत पहिल्यांदा गेले. त्यानंतर 8 फेब्रुवारी 2017 मध्ये पुन्हा दुसऱ्या वेळेस निवडुन आले. त्यानंतर 2017 ते 2022 पर्यंत ते तिसऱ्यांदा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून निवडणून आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी विजय मिळवत चौथ्यांदा मराठवाडा शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवला आहे.

भाजपकडूनही जोरदार प्रयत्न

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला मराठवाडा शिक्षक मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून देखील जोरदार प्रयत्न करण्यात आले. यासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. किरण पाटील यांच्या प्रचारासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेतली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात बैठका घेतल्या. मात्र असे असले तरीही भाजप उमेदवार किरण पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

ही बातमी देखील नक्की वाचा

Satyajeet Tambe: सत्यजीत तांबेंचा विजय... 'मामा-भाच्यां'नी मिळून काँग्रेसला 'मामा' बनवलं की काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली? 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget