Accident: उत्तराखंडमधील अपघातात औरंगाबादच्या महिला डॉक्टराचा मृत्यू; जखमींमध्ये बहुतांश प्रवासी...
अपघातमध्ये जखमी प्रवाशांमध्ये बहुतांश प्रवासी औरंगाबादचे असल्याचे सुद्धा समोर आलं आहे.
Accident News: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री महामार्गावर प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघातात 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. कोपांग बंदजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच कोपांग येथील आयटीबीपीचे जवान अपघातस्थळी पोहोचले. तर मृत महिला औरंगाबाद शहरातील असून नामांकित डॉक्टर आहेत.
हर्षिल पोलीस ठाण्याचे अधिकारी दिलमोहन सिंग यांनी सांगितले की, गंगोत्री महामार्गावर कोपांगजवळ रविवारी रात्री दीडच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. वाहन अपघातात अलका एकबोटे (45) ( रा. औरंगाबाद) आणि माधवन ( पूर्ण नाव माहित नाही ) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 15 जण जखमी झाले असून यातील काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तर वाहनातील बहुतांश प्रवासी औरंगाबादचे राहवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हा अपघात एवढा गंभीर होता की, कोपंग येथे तैनात असलेल्या आयटीबीपीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरु होते. त्यांनतर सर्व जखमींना लष्कराच्या हर्षिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच प्राथमिक उपचार करून काही प्रवाशांना उत्तरकाशीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
बहुतांश प्रवासी औरंगाबादचे आहेत...
अपघातात मृत्यू झालेल्या अलका बोटे औरंगाबादच्या रहिवासी असून, त्या एका शहरातील एका नामांकित रुग्णालयात नोकरी करतात. तसेच अपघातात जखमी असलेल्या प्रवाशांमध्ये बहुतांश प्रवासी औरंगाबादचे असल्याचे सुद्धा समोर आलं आहे. पण त्यांची नावे अजून कळू शकली नाही.
जखमींची संख्या अधिक...
या अपघातात 15 प्रवासी जखमी झाल्याचे सुद्धा कळत आहे. ज्यात उमा पाटिल, अरनभ महर्षि, साक्षी सिन्धे, अर्चना सिंधे, अनया महाजन, अनुप्रिया महर्षि, सही पवार, सुभाष सिंह राणा, डॉ वेंकेटेश, वर्षिता पाटिल, आमरा एकबोटे, रजनीश सेठी, व जितेंद्र सिंह अशी नावे आहेत.यातील औरंगाबदचे प्रवासी नेमके कोणते हे सुद्धा अजून स्पष्ट होऊ शकले नाही.