Aurangabad News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहे. याचवेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipanrao Bhumre) यांच्या पैठण मतदार संघात त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या दृष्टीने शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पैठण तालुक्यात बैठकांवर बैठकांचं नियोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चार दिवसात तब्बल 23 बैठका घेण्याचं नियोजन शिंदे गटाकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सभा जोरदार करण्यासाठी शिंदे गटाची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाचे प्रमुख नेते कामाला लागले आहे. ज्या पैठण तालुक्यात एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे, त्या पैठणमध्ये शिंदे गटाकडून दौऱ्याच्या निमित्ताने नियोजन बैठका घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण असलेल्या सर्वच प्रमुख गावात शिंदे गटाचे महत्वाचे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहे. 5 सप्टेंबर ते 8  सप्टेंबर या चार दिवसांत तब्बल 23 बैठका होणार आहे. ज्यात 12 जिल्हा परिषद गट आणि 23 पंचायत समिती गणाचे समावेश आहे. 


 सभेतही सर्वत्र धनुष्यबाण...


शिवसेनेचा पक्ष चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा यावरून उद्धव सेना आणि शिंदे सेनेते वाद सुरु आहे. प्रकरण आता न्यायालयात जाऊन पोहचले आहे. असे असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत सुद्धा धनुष्यबाणाचा वापर केल्या जाण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या नियोजनाच्या बैठकीसाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवर धनुष्यबाण वापरण्यात आला आहे. सोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सभेतही सर्वत्र धनुष्यबाण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


पोलिसांकडून मैदानाची पाहणी...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणच्या कावसनकर स्टेडियमवर 12 सप्टेंबरला जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दृष्टीने कंबर कसली आहे. सर्वच विभागातील यंत्रणा मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या दृष्टीने कामाला लागली आहे. दरम्यान पोलिसांकडून सुद्धा पैठणच्या कावसनकर स्टेडियमची प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. पैठणचे पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांनी स्वतः मैदानाची पाहणी करत आढावा घेतला आहे. तर तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांना सभेच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad : मुख्यमंत्र्यांचा 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौरा, भुमरेंच्या मतदारसंघात जाहीर सभा


Shahajibapu Patil: शहाजीबापू पाटील म्हणतात, पुढची तोफ आता पैठणमध्ये धडाडणार; ओकेमध्ये उत्तर मिळणार