Jayakwadi Dam Water Update: नाशिक जिल्ह्यातील धरणातून सुरु असलेली पाण्याची आवक कमी होताच जायकवाडी धरणाचे उघडण्यात आलेले आपत्कालीन दरवाजे बंद करण्यात आले आहे. शनिवारी जायकवाडी धरणात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणावर सुरु होती. त्यामुळे धरणाच्या एकूण 9 आपत्कालीन दरवाज्यांपैकी 7 आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र आता वरील धरणातील पाण्याचा वेग कमी झाल्याने विसर्गही कमी करण्यात आला आहे.
यावर्षी जुलै महिन्यातच धरणात पाण्याचा साठा 90 टक्केपेक्षा अधिक झाला होता. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आणखी दोन वेळा म्हणजेच यावर्षी आतापर्यंत तीनवेळा जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शनिवारी पहिल्यांदाच आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र पाण्याचा वेग कमी झाल्याने पुन्हा पाचही आपत्कालीन द्वार आता बंद करण्यात आली आहे.
18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु...
जायकवाडी धरणाच्या एकूण 27 दरवाज्यांपैकी 18 दरवाजे अजूनही उघडेच असून, त्यातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 10 ते 27 क्रमांकाचे सद्या उघडलेले आहेत. उघडण्यात आलेल्या सर्व 18 दरवाज्यांमधून 3 फुट उंचीवर द्वार उचलत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सद्या धरणातून 57 हजार 992 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
आत्ताची परिस्थिती...
- पुर्ण संचय पातळी (FRL) : 1522.00 फुट
- सध्याची पाणी पातळी (WL) : 1521.32 फुट
- जिवंत पाणी साठा (Live) : 2089.735 दलघमी (73.79 टिएमसी)
- एकुण पाणी साठा (Gross) : 2827.841 दलघमी (99.85टिएमसी)
- पाण्याची आवक (Inflow):46986 क्युसेक्स
- पाण्याचा विसर्ग (Discharge) : 57992क्युसेक्स
- एकूण उघडलेले द्वार : 18 ( द्वार क्रमांक 10 ते 27)
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी...
औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी (Heavy Rain ) लावली आहे. तर शनीवारी ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान गंगापूर आणि वैजापूर या दोन तालुक्यात कालच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी पिके आडवी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Jayakwadi Dam: यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले; नदीकाठावर अलर्ट
Photo : औरंगाबादमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिके आडवी