Auranagbad News: औरंगाबाद महानगरपालिकेने मोठी कारवाई करत रस्त्यांवर बिनधास्तपणे मोकाट वराह सोडणाऱ्या मालकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीर पणे मोकाट वराह, जनावरे पाळणाऱ्या मालकविरुद्ध कारवाई करणे व अवैध पणे जनावरांची कत्तल प्रकरणी कारवाई करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान पथकाला मोकाट वराह आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी झोन क्र.2 अंतर्गत औरंगपुरा येथील जिल्हा परिषद गणपती विसर्जन परिसर येथे पथक पाहणी करण्यास गेले होते. यावेळी परिसरातील नाल्यामध्ये मोकाट वराह व जनावरे दुर्गंधी पसरवून इकडे तिकडे फिरताना पथकास आढळून आले. सदर ठिकाणी आढळून आलेल्या विदेशी जातीच्या वराहांना त्यांचे खाद्य न देता उपाशी ठेवून नाल्यात सोडून प्राणी कुर्ता बाबत वागणूक करीत असल्याचे पथकाचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे मनपाच्या पथकाने मालकांच्या विरोधात कारवाई केली आहे.
प्रशासनाच्या आदेशाला कराची टोपली...
महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वीही शहरातील मोकाट डुकरे शहराबाहेर हलविणे बाबत माहे फेब्रुवारी 2021 मध्ये जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले होते. तसे सर्व वराह मालकांना कळविण्यात आले होते. परंतु वराह मालक अनिल चावरीया व सुनील चावरीया (रा.दलालवाडी, औरंगाबाद) यांनी सदर नोटिसीची अवहेलना करून सार्वजनिक ठिकाणी आरोग्यास धोका निर्माण होईल असे वर्तन केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
पोलिसात गुन्हा दाखल..
त्यामुळे या दोघांच्या विरोधात स्वछता निरीक्षक श्रीमती किरण बोराडे यांनी क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे सार्वजनिक ठिकाणी जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हायगयीची कृती, लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे व अन्यथा शिक्षापात्र नसलेल्या प्रकरणी सार्वजनिक उपद्रवसाठी अनुक्रमे भादवी कलम 188, 269 व 290 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यासाठी फिर्याद दिली होती. त्यानुसार अखेर शहरातील क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोकाट कुत्र्यांनाही पकडण्यासाठी पथक तैनात...
औरंगाबाद शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून मोकट कुत्र्यांचा संचार अधिक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी पथक तैनात करण्यात आले. याबाबत एका खाजगी कंपनीला मनपाकडून कंत्राट देण्यात आला आहे. संबंधित कंपनीकडून मोकाट कुत्र्यांना जेरबंद करून, लस देण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या...
Photo: औरंगाबाद महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये; अतिक्रमणांवर जेसीबी फिरवला
धक्कादायक! प्रेमसंबंध ठेवण्यासाठी घराशेजारी राहणाऱ्या महिलेचा तगादा; तरुणाने संपवलं जीवन