Aurangabad: पावसामुळे तब्बल आठ तासानंतर गावात आणला मृतदेह; नदीला पूर आल्याने हाल
Aurangabad News: अखेर गावकरी आणि महिलेच्या काही नातेवाईकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह गावात आणण्यात आला.

Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गाव, तांडा आणि शेत वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान अशीच काही परिस्थिती सोयगाव तालुक्यातील वरठाण परिसरात पाहायला मिळाली. परिणामी शेतात राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह गावात आणण्यासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर गावकरी आणि महिलेच्या काही नातेवाईकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह गावात आणण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोयगाव तालुक्यातील वरठाण परिसरातील तिडका येथील अकबर शहा हे आपल्या कुटुंबासह गावापासून दोन किलोमीटर अतंरावर असलेल्या शेतात वास्तव्यास आहे. दरम्यान अकबर शहा यांची पत्नी हापीजा शहा यांचे आज सकाळी चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या दफनविधी गावातील कब्रस्थानमध्ये करायचे आहे. परंतु तिडकासह परीसरात काल झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पुर आला आहे.
गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह आणला गावात
कालपासून सुरु असलेला पाऊस काही थांबत नव्हता. मात्र सकाळी पावसाने विश्रांती दिली. पण नदीला आलेल्या पुरामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. त्यात दुसरा रस्ता नसल्याने तब्बल पाणी कमी होण्यासाठी आठ तास थांबावे लागले. कंबरेएवढं पाणी झाल्यावर गावकरी आणि हापीजा यांच्या काही नातेवाईकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह गावात आणण्यात आला आणि दफनविधी करण्यात आली.
जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर...
बनोटीसह परीसरात पंधरा तासाच्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. तर बनोटी, वरठाण, किन्ही, दस्तापुर भागातील जमिनी खरडून पिके भुईसपाट झाली आहे. तर वरठाण येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने काही वेळेसाठी वरठाणवाशीयांचा ईतर गावाशी संपर्क तुटला होता.सोबतच नदीस मोठा पुर आल्याने पावसाचे पाणी दुकानात, घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: कन्नड तालुक्यातील शिवना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, धरण 100 टक्के भरलं
मोठी बातमी! औरंगाबादच्या पिशोर भागात ढगफुटी सदृश पाऊस; सात गावांचा संपर्क तुटला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
