Corona Fourth Wave: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच तिसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा महराष्ट्रातील रुग्णही वाढतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असून, लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुस्टर डोस न घेणाऱ्या हेल्थ आणि फ्रंट वर्कर यांना जुलै महिन्याचा पगार मिळणार नाही असा इशारा दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर खळबळ उडाली आहे. 


जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. यावेळीहेल्थ आणि फ्रंट वर्कर यांना प्राधान्याने बूस्टर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यात अजूनही 13 हजार 833 हेल्थ आणि फ्रंट वर्कर बूस्टर डोसपासून वंचित असून 'जुलैअखेरपर्यंत डोस घ्या, नसता ऑगस्टमध्ये पगार मिळणार नाही,'असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे. सोबतच वेतनपत्र काढण्यापूर्वी बूस्टर डोस घेतल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक आस्थापना प्रमुखांनी तपासावे, अशा सूचना सुद्धा यावेळी करण्यात आल्या आहेत.


Aurangabad: बुस्टर डोस नाही, तर पगारही नाही; ग्रामपंचायत निधीही रोखणार


जिल्ह्यात 35 लाख 76 हजार738 कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत आतापर्यंत पहिला डोस 30 लाख 26  लोकांनी (84.62 टक्के) घेतला आहे. तर दुसरा डोस23 लाख 34 हजारांवर (65.28 टक्के) नागरिकांनी घेतला आहे. काहींना हे डोस घेऊन वर्ष होत आले आहे. तर काहींना सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या नागरिकांनी आता बूस्टर डोस घेणे आवश्यक असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 


बुधवारी 42 रुग्णांची वाढ...


औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी एकूण 42 रुग्णांची वाढ झाली आहे. ज्यात ग्रामीण भागातील 21 तर शहर हद्दीतील 21 रुग्णांचा समावेश आहे. तर 41 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. सद्या जिल्ह्यात 307 सक्रीय रुग्ण आहे. मात्र त्यातील 278 जणांना कोणतेही गंभीर लक्षणे नसल्याने ते घरीच उपचार घेत आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Coronavirus Cases in India : देशात कोरोना प्रादुर्भावात पुन्हा वाढ; गेल्या 24 तासांत 21 हजार 566 नवे रुग्ण


Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 2325 कोरोना रूग्णांची नोंद तर 2471 रुग्ण कोरोनामुक्त