Aurangabad News: अखेर जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचं ठरले असून, धरणातील पाणीसाठा 90 टक्के पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्याचे निर्णय झाला आहे. पाणीसाठ्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली आहे. त्यानुसार धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन जलसंधारण विभागाने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 1798 दलघमी असून तो 1953 दलघमी झाल्या नंतरच म्हणजेच, 90 टक्के साठा झाल्यानंतरचं पाणी सोडण्यात येणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 


यावेळी पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नदीच्या धोक्याची पाणी पातळी निश्चीत करण्यासाठी ‘बल्यूलाईन मार्किंग’ करण्याचे निर्देश देवून सदरील खर्चास जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.  तसेच पुढील काही दिवसात धरणात येणारा पाणीसाठा लक्षात घेता परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही माहिती चव्हाण यांनी दिली आहे.


जायकवाडी धरणाची आत्ताची परिस्थिती...


आज सकाळी सहा वाजेच्या आकडेवारीनुसार, धरणातील पाणीसाठा 82.86 टक्के झाला आहे. तर धरणात अजूनही 27 हजार 387 क्युसेकने आवक सुरूच आहे. धरणात सद्या पाण्याचा जिवंतसाठा 1798.762 दलघमी आहे. तसेच धरणातील पाणीसाठा फुटमध्ये 1518.70 फुट असून, मीटरमध्ये 462.900 मीटर आहे. 


असा सुरु आहे विसर्ग...


मराठवाड्यातील इतर धरणाची पाणीपातळी लक्षात घेता, जायकवाडी धरणावरील जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु केला जात आहे. सोबतच उजव्या कालव्यातून 300 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे हे पाणी बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात दाखल होत आहे. माजलगाव धरणात अजूनही पाण्याचा साठा हवा तेवढा नसल्याने जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे उजव्या कालव्यावर अवलबून असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या...


धक्कादायक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील घटना


Aurangabad: औरंगाबादची वाटचाल 'क्राईम कॅपिटल'कडे; शहरात सहा महिन्यांत तब्बल 25 खून