मुंबई :   राज्यात आज 2325 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2471  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. 


सात कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज  सात  कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,62,431 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 14636 सक्रिय रुग्ण


राज्यात एकूण 14636 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 5305  इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 2003  सक्रिय रुग्ण आहेत.


देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ


 देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. गेले दोन दिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मागील दोन दिवस देशात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याची नोंद झाली होती. पण आज पुन्हा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात 40 कोरोना रुग्णांनी प्राण गमावला आहे. यासह देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 517 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाने 40 रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 5 लाख 25 हजार 825 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1 लाख 45 हजार 654 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. 


संबंधित बातम्या :