Aurangabad News: पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलतांना, आता आमचं बहीण भावाचं नात राहिलं नसून, आम्ही आता राजकीय वैरी असल्याची प्रतिक्रिया देणाऱ्या धनंजय मुंडे यांनी दिली होती. त्यांच्या याच विधानावरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आपल्या खोचक शब्दात मुंडे यांचा समाचार घेतला आहे. परळीत आलेल्या आपल्या पत्नीला वाईट वागणूक देणाऱ्या धनंजय मुंडेंना नातं काय असतं कसं कळणार, असा टोला महाजन यांनी लगावला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना ते म्हणाले. 


यावेळी बोलतांना प्रकाश महाजन म्हणाले की, ज्याचा त्याच्या संस्कारांचा भाग असतो. राजकीय विचार, लढाई वेगळी आणि नातं हे वेगळ्या गोष्टी आहे. पण यात नाती तुटायला नको हवीत मी या मताचा आहे. मी जेवढ्यावेळी धनंजय मुंडेच्या घरी जेवलो असेल तेवढं, पंकजा मुंडेच्या घरी नाही जेवलो. 2019 ला बीडा गावात धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींबाबत काय वक्तव्य केले होते आठवा एकदा, गोपीनाथ मुंडे यांना जिवंतपणी काय-काय बोलले हेही आठवा. धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे ओळख मिळाली, असल्याच प्रकाश महाजन म्हणाले. 


स्वतःच्या पत्नीला काय वागणूक दिली?


पुढे बोलतांना ते म्हणाले की, सात जन्माची नातं असणाऱ्या आपल्या पत्नीला ( करुणा मुंडे) परळीत कशी वागणूक दिली सर्वांनी पाहिले. त्यामुळे यांना नातं काय कळणार असा खोचक टोला महाजन यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. पंकजा मुंडेंच्या आईला गॉड मदर म्हणणारे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्याबद्दल काय बोलतात?..नात्यात संबध कमी-जास्त ठेवू शकतात, पण अशा पद्धतीने बोलणं योग्य नसल्याचे प्रकाश महाजन म्हणाले. 


धनंजय यांच्याबद्दल पंकजा मुंडे वाईट आयुकून घेत नाही...


रक्ताची नातं कधीच तुटत नाही, पण असे बोलणं संस्कारांचा भाग आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद संपवण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही. धनंजय मुंडे कधी माझ्यावर समोर आले नाही. तर पंकजा मुंडे या कधीच धनंजय मुंडे बद्दल वाईट आयुकून घेत नाही. धनंजय मुंडे यांनी सर्व बहिणींना सांभळून घेतले पाहिजे, पण ते असे विधान करत आहे. असे वक्तव्य आयकून वेदना होतात असेही महाजन म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या...


Dhananjay Munde : बहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी; धनंजय मुंडेंचं वक्तव्य


'वैद्यनाथ'च्या सभेत 'मुंडें'नी एकमेकांसमोर येणं टाळलं; धनंजय मुंडे म्हणाले, आम्ही एकमेकांसमोर आलो असतो तर...