प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना, एकाच प्लॅटफॉर्मवर दोन रेल्वेगाड्या समोरासमोर; सुदैवाने...
Railway: यात कोणाची चुकी होती याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

Aurangabad News: औरंगाबादच्या लासूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) दोन रेल्वेगाड्या समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला. नेमकं काय घडतय कोणालच काही कळत नव्हते. मात्र रेल्वे स्थानक आल्याने अगोदरच कमी स्पीड असलेल्या रेल्वे चालकाने गाडी थांबविली आणि मोठा अनर्थ टळला. आता यात कोणाची चुकी होती याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
त्याचं झालं असे की, शुक्रवारी रात्री सव्वासातच्या सुमारास जालना नगरसूल डेमो पॅसेंजर (07492) दोन नंबरच्या ट्रॅकवर जाण्याऐवजी एक नंबर प्लॅटफॉर्मवर आली. मात्र, त्या अगोदर समोरून त्याच प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्याच विद्युतीकरण कामाची स्पेशल दोन डब्यांची रेल्वेगाडी उभी होती. दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर आल्याने काही वेळेसाठी गोंधळ उडाला. दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशांना समोर उभी असलेली रेल्वे दिसल्याने त्यांच्या काळजाचा ठोका उडाला. काय होतेय कोणालाच कळत नव्हते. मात्र रेल्वे स्थानक आल्याने अगोदरच कमी स्पीड असलेल्या डेमोच्या पॅसेंजरच्या चालकाने गाडी थांबविली. त्यामुळे गाडी थांबली मात्र दोन्ही रेल्वे गाड्यांत अवघे दोन ते तीन फुटाचे अंतर उरले होते. त्यानंतर रेल्वेने डेमो पॅसेंजरला पुन्हा मागे घेऊन दोन नंबर ट्रॅकवर आणले. सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही.
दोषींवर काय कारवाई होणार?
याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र या संदर्भात सिग्नल प्रणालीच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी हे कस झाले याची तपासणी करीत असून, यात नेमकं कोण दोषी की तांत्रिक बिघाड हे स्पष्ट होईल. मात्र रेल्वेचा वेग जास्त असता तर काय घडलं असतं याचा अंदाज देखील लावता येणार नाही. त्यामुळे यातील दोषींवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी...
रात्री सव्वासातच्या सुमारास एक नंबरच्या फलाटावर दोन गाड्या समोरासमोर आल्याची घटना, रेल्वे सिग्नल प्रणालीत तांत्रिक बिघाडाने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. रात्री डेमो जालना-नगरसूल गाडीतील प्रवाशांनी ही माहिती दिल्याने घटनेला वाचा फुटली. काहींनी या दोन्ही गाड्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. रेल्वेने ही चुक कशी झाली याची तत्काळ चौकशी सुरु केली असून, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी लासूरला येऊन गेले. मात्र याबाबत गुप्तता पाळली जात आहे.
Ajanta-Ellora Cave: आधी राज्यातील उद्योग गेले, आता जागतिक वारसास्थळांचा दर्जाही जाण्याचा धोका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
