Ganesh Visarjan In Aurangabad: राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबई पुण्यात मानाचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले आहेत. तर औरंगाबादमध्येही आता विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली आहे. सकाळी अकरा वाजता शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. शहरात सर्वप्रथम संस्थान गणपती येथून मिरवणुकीला सुरवात होते. त्यानंतर इतर गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले जातात. यावेळी सुद्धा सर्वच पक्षातील नेत्यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळत आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेश भक्तांना साद्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. मात्र यावेळी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्त बाप्पाच्या निरोपासाठी तयार झाले आहेत. औरंगाबादचा मानाचा गणपती असलेल्या संस्थान गणपतीची मिरवणूक निघाली आहे. त्यामुळे आता या मिरवणूकीनंतर इतर गणपती विसर्जन मिरवणुका निघणार आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याप्रमाणे औरंगाबाद शहरात सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. ज्यात पोलीस आयुक्त 01, पोलीस उपायुक्त 04, सहायक आयुक्त 06 , पोलीस निरीक्षक 40, सपोनि, उपनिरीक्षक 136, पोलीस अंमलदार 2238, महिला अंमलदार 314 यांचा समावेश असणार आहे. तसेच शहरभरात पोलिसांचे पथक गस्तीवर सुद्धा असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार विसर्जन...
औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनाने विसर्जनाची तयारी केली आहे. ज्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मैदानावर असलेल्या विहिरीचे सुद्धा समावेश आहे. यासाठी प्रशासनाने विहिरीची रंगरंगोटी केली आहे. तर त्याच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे.
नेत्यांनी धरला ठेका...
संस्थान गणपतीच्या मिरवणूकीत सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले आहे. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ठेका धरत आनंद साजरा केला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सुद्धा सहभाग पाहायला मिळाला. आता मिरवणूक विसर्जनाच्या दिशेने निघाली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: पोलिसांनी डीजे विरोधात खातं उघडलं; मिरवणुकीपूर्वीच दोन डीजे घेतले ताब्यात
Aurangabad: गणेश विसर्जनावेळी औरंगाबाद शहारतील 'हे' मार्ग राहणार बंद; वाहतूक पोलिसांची माहिती