Aurangabad Traffic Update: आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला अवघ्या एक दिवसांचा कालवधी उरला आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुका सुलभ होण्यासाठी औरंगाबाद शहरातील दैनंदिन वाहतुकीत पोलिसांनी बदल केला आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी दैनंदिन वाहतूक काही मार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. सकाळी 7 ते रात्री गणेश विसर्जनापर्यंत वाहतुकीत केलेले बदल कायम असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 


उद्या हे मार्ग राहणार बंद...



  • संस्थान गणपती ते बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, एस.बी. कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदान.

  • सिटीचौक ते जुनाबाजार मार्गे भडकलगेट. 

  • जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट-मोंढा ते राजाबाजार.

  • निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन.

  • भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन.

  • चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.

  • लोटाकांरजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड..

  • कामाक्षी लॉज ते सिटीचौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केट मार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व

  • पुर्व-पश्चिम गल्ल्या बंद राहतील.

  • सिटीचौक पोलीस स्टेशन पश्चिमेकडील बु-हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली.

  • बुढीलाईन, जूने तहसिल कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.

  • सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक.

  • अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते बाबुराव काळे चौक.

  • रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबुराव काळे चौक.

  • सावरकर चौक, एम.पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा/बळवंत वाचनालय चौक.


नविन औरंगाबाद सिडको हडको, गजानन महाराज मंदीर विसर्जन मिरवणुकीसाठी खालील दर्शविलेल्या मार्गाने वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद राहील.



  • चिश्तीया चौक- अविष्कार चौक- बजरंग चौक ते बळीराम पाटील शाळा चौक, ओंकार चौक ते सिडको पोलीस स्टेशन समोर- एन-7 बस स्टॉप- पार्श्वनाथ चौक- एन 9 एम-2 एन 11 - जिजाऊ चौक- टी. व्ही. सेंटर चौक ते - एन- 12 स्वर्ग हॉटेल जवळील विहीर पर्यत. तसेच जिजाऊ चौक ते शरद टी.

  • चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टी. व्ही. सेंटरकडे जाणारा रस्ता.

  • एन 1 चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल जकात नाका तसेच चिस्तीया चौक ते व्दारकादास साडी सेंटर.

  • आझाद चौक ते बजरंग चौक, देवगिरी नागरी सहकारी बॅक.

  • सेव्हनहील ते शिवाजीनगर, त्रिमुर्ती चौक ते गजानन मंदीर, पटीयाला बॅक ते गजानन मंदीर.


पोलिसांचा तगडा बंदोबस्त...


उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी औरंगाबाद शहर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. ज्यात  पोलीस आयुक्त 01, पोलीस उपायुक्त 04, सहायक आयुक्त 06 , पोलीस निरीक्षक 40, सपोनि, उपनिरीक्षक 136, पोलीस अंमलदार 2238, महिला अंमलदार 314 यांचा समावेश असणार आहे. 


महत्वाच्या बातम्या...


IT Raid: औरंगाबादमध्ये दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची कारवाई सुरूच, 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचे पथक


Crime: 'मला आय लव्ह यू म्हण, नाहीतर गल्लीत फोटोचे बॅनर लावीन'; पोलिसात मजनूविरोधात गुन्हा दाखल