एक्स्प्लोर

Astrology: औरंगाबादेत पार पडलं ज्योतिष अधिवेशन; मोदींचा राजयोग, फडणवीसांना पक्षातून विरोध, तर ठाकरेंची...

National Astrology Conference: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून (Eknath Shinde) तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांचे राजकीय भविष्यवाणी करण्यात आली. 

National Astrology Conference in Aurangabad: औरंगाबादमध्ये राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाअधिवेशनात वास्तुशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्राचे ज्योतिषी सहभागी झाले होते. या महाअधिवेशनाचे आयोजन ब्राह्मण समाजातर्फे करण्यात आले होते. यावेळी वेदमूर्ती अनंत पांडव यांनी राज्य आणि देशातील महत्वाच्या राजकीय नेत्यांची भविष्य सांगितले. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून (Eknath Shinde) तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे राजकीय भविष्यवाणी करण्यात आली. 

पहा कोणाची काय भविष्यवाणी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi):  पंतप्रधान यांना राजयोग आहे. तर त्यांच्या विरोधात अनेक विरोधक तयार होतील, मात्र त्यावर ते मात करणार आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक दहशतवादी आणि राष्ट्रवाद या विषयांवर होणार आहे. सोबतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 418 जागा मिळणार आहे. पंतप्रधान मोदी 2028 मध्ये त्यांच्यावरील जबाबदारी दुसऱ्याला देतील. 

राहुल गांधी (Rahul Gandhi) : राहुल यांना देखील राजयोग आहे. मात्र त्यांना पंतप्रधान पदासाठी अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागणार आहे. राहुल गांधी पंतप्रधान पदापासून दूर राहतील, कारण त्यांच्या कर्म स्थानातील गुरु तसेच षष्टमस्थानातील रवी मंगळ हे ग्रह त्यांना उच्च पदापासून दूर ठेवतील.

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath): याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राजकीय भविष्यवाणी करण्यात आली. ज्यात योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीत उच्च राजयोग आहे. तर ते पुन्हा मुख्यमंत्री होतील. तसेच संन्यास राजयोग आहे. 

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal): यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची देखील राजकीय भविष्यवाणी सांगण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या कुंडलीत राजयोग आहे. तसेच 2026 पर्यंत ते मुख्यमंत्री असतील. 

राज्यातील राजकीय नेत्यांची भविष्यवाणी... 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray): माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भविष्यवाणी सांगतांना ठाकरे यांच्या कुंडलीनुसार सहकाऱ्यांसोबत मतभेद होतील. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. उद्धव ठाकरे यांना जानेवारीपासून चांगले दिवस येणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde): मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुंडलीनुसार सध्याचा काळ भाग्योदयाचा आहे. तसेच राजयोग आहे. मात्र ते मुख्यमंत्री होतील की नाही हे पुढे कळेल. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis): फडणवीस यांच्या कुंडलीनुसार पक्षांतर्गत त्यांना भरपूर विरोध होणार आहेत. यांच्या कुंडलीतील अष्टमस्थानातील गुरु महाराजांचे भ्रमण चालू असल्या कारणाने त्यांना पक्षांतर्गत व इतर स्थानातून भरपूर विरोध होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. तर फडणवीस यांना अनेक संकटांचा सामना करून बुधादित्य नावाच्या राज योगामुळे ते पुन्हा एकदा उच्चपद प्राप्त करतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Embed widget