एक्स्प्लोर

Gram Panchayat Election: निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

Gram Panchayat Election: गैरहजर राहीलेल्या कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे.

Gram Panchayat Election: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) एकूण 216 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यामुळे यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणुका विभागाकडून (Election Department) जोरदार तयारी करण्यात येत. सोबतच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) 6 डिसेंबर व 12 डिसेंबर 22 रोजी, मतदान अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. मात्र या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती तहसिलदार ज्योती पवार यांनी दिली आहे. 

पवार यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद तालुक्यातील 35  ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर निवडणूकीसाठी 6 डिसेंबर व 12 डिसेंबर 22 रोजी, मतदान अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. तथापि बरेच कर्मचारी हे वॉरंट देऊनही सदर प्रशिक्षणास गैरहजर राहिले आहे. गैरहजर राहीलेल्या कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. सदर कर्मचारी जर निवडणूक कामावर हजर झाले नाही तर त्यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 23 नुसार कारवाई करण्यात येईल. त्यामुळे गैरहजर असलेल्या कर्मचारी यांनी 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तहसिल कार्यालय, औरंगाबाद येथे प्रशिक्षणास हजर राहावे. नसता त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करावा, असे निर्देश तहसिलदार ज्योती पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

216 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी

औरंगाबाद जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 216 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली असून, प्रचाराचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात थेट सरपंचपदासाठी 1092, तर सदस्यपदासाठी 5481 अशा 6573 उमेदवारांनी अर्ज दाखल झाली होती. त्यांपैकी 371 जणांचे अर्ज छाननीत बाद झाले, तर 1900 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी 611 तर सदस्यासाठी 3626 असे 4237 उमेदवार शिल्लक आहेत. विशेष म्हणजे यातील थेट सरपंचपदी 14 तर सदस्यपदी 308 उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीची आकडेवारी 

तालुका    सरपंच पदाचे उमेदवार सदस्य पदाचे उमेदवार  बिनविरोध सरपंच  बिनविरोध सदस्य 
औरंगाबाद 100 577 02 61
पैठण 60  472  00 09
फुलंब्री  49 321  03  21
सिल्लोड  54  352 00 15
सोयगाव 11 26 01 26
कन्नड 140 833 03 63
खुलताबाद   29 200 01 12
वैजापूर  79  382 01 46
गंगापूर  89  463 03 55
एकूण  611  3626 14 308
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget