Dasra Melava: औरंगाबादेतून 250 बसेस दसरा मेळाव्याला; प्रवाशांचे प्रचंड हाल, खासगी वाहनचालकांची मनमानी
Aurangabad: तासनतास उभे राहून सुद्धा नागरिकांना बसस्थानकात एसटी बसे मिळाली नाही.
Aurangabad ST Bus Update: बुधवारी मुंबईत झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava) राज्यभरातून कार्यकर्ते गेले आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईत नेण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांकडून एसटी महामंडळाच्या बसेस बुक (ST Mahamandal Bus Booking) करण्यात आल्या होत्या. औरंगाबाद जिल्ह्यातून या मेळाव्यासाठी तब्बल 250 बस मुंबईला गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामन्य प्रवाशांचे गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड हाल होत आहे. औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात तासनतास उभे राहून सुद्धा नागरिकांना एसटी बसे मिळाली नाही. त्यामुळे त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागला.
मुंबईत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी औरंगाबाद येथून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी साडेतीनशे बसेस बुक केल्या होत्या. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 250 बसेस पुरवण्यात आल्या होत्या. औरंगाबाद जिल्ह्यातील 536 पैकी 250 बस कमी झाल्याने नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले. यामुळे खासगी वाहनचालकांनी मनमानी भाडेवसुली करत प्रवाशांची लुट केली. पर्याय नसल्याने प्रवाशानाही खासगी वाहनानेच प्रवास करावा लागला.
औरंगाबाद विभागातून गेलेल्या बस...
अ.क्र. | ठिकाण/तालुका | बस संख्या |
1 | सिडको बसस्थानक | 48 |
2 | मध्यवर्ती बसस्थानक | 42 |
3 | पैठण | 30 |
4 | सिल्लोड | 36 |
5 | वैजापूर | 28 |
6 | कन्नड | 28 |
7 | गंगापूर | 25 |
8 | सोयगाव | 13 |
एकूण | --- | 250 |
सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल...
सद्या सणासुदीचा काळ (Festival Season) सुरु आहे. त्यात काही यात्रा सुद्धा भरल्या आहेत. अशातच एसटी बसेस मेळाव्याला गेल्याने प्रवाशांचे हाल होतायत. भाविकांना तासनतास बसस्थानकात उभं राहून गाडी लागत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळाला. सोबतच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फटका बसला असल्याचे पाहायला मिळत आहे.