एक्स्प्लोर

Aurangabad: जायकवाडी धरणाचे 18 पैकी 10 दरवाजे बंद; विसर्गाबरोबर आवकही घटली

Aurangabad News: जायकवाडी धरणातून सद्या एकूण 5 हजार 781 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Aurangabad News: मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) केला जाणार विसर्ग आणखी कमी करण्यात आला असून, उघडण्यात आलेल्या 18 पैकी 10 दरवाजे बंद करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांपासून धरणातील 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्रा आता फक्त आठच दरवाजे सुरु ठेवण्यात आले आहे. तर धरणातून सद्या एकूण 5 हजार 781 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.

सहा दिवसांपूर्वी म्हणजेच 25 जुलैला जायकवाडी धरणातील 10 ते 27 अशा एकूण 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. त्यांनतर टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात सुद्धा आला होता. मात्र पाण्याची वरील आवक कमी झाल्याने विसर्ग सुद्धा कमी करण्यात आला. तर आता आवक मोठ्याप्रमाणावर कमी झाली असल्याने 18 पैकी 10 दरवाजे बंद करण्यात आले आहे. ज्यात द्वार क्र. 10, 27, 18, 19, 16,21, 14, 23, 12 व 25  चा समावेश आहे. बंद करण्यात आलेल्या या दहा दरवाज्यातून 0.5 फुट उंचीवरून पाणी सोडण्यात येते होते. मात्र दरवाजे बंद करण्यात आल्याने त्यातून होणार विसर्ग सुद्धा बंद झाला आहे. 

उरलेल्या आठ दरवाज्यातून सद्या 4 हजार 192 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्युसेक असा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे दोन्ही मिळवून जायकवाडी धरणातून सद्या एकूण 5 हजार 781 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर पाण्याची आवक आणखी कमी झाल्यास सुरु असलेले आठही दरवाजे सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

पाणी प्रश्न मिटला...

दुष्काळवाडा म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यावर्षी सुद्धा जुलै महिन्यातच विभागात अतिवृष्टी पाहायला मिळाली. त्यामुळे विहिरी, छोटे-मोठे तलाव आणि धरणातील पाणीसाठा वाढला आहे. तर जामिनाच्या पाणीपातळीत सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षीचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरारZero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रKurla Bus Accident : ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, कुर्ल्यात बेस्ट बस थेट सोसायटीत घुसलीZero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Embed widget