महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्मारक-पुतळ्यास माझा विरोध राहणारच: इम्तियाज जलील
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे.
Imtiaz Jalil letter to Chief Minister: महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्मारक व पुतळ्यास माझा विरोध आहे व राहणारच. स्मारक व पुतळ्याऐवजी त्या महापुरुष व लोकनेत्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेला लाभ मिळेल असे लोकोपयोगी प्रकल्पास माझा संपुर्ण पाठिंबा असणार असल्याच, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
रुग्णालयास गोपीनाथ मुंडेंच नाव द्या..
पत्रात पुढे लिहताना जलील म्हणाले की, औरंगाबाद येथे स्मारकाऐवजी महिला व शिशुसाठी उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज 400 खाटांचे रुग्णालयास लोकनेते गोपीनाथ मुंडे (gopinath munde) साहेबांचे नाव देण्यात यावे. मी एमआयएम पक्षाचा खासदार असुन आमचे राजकीय व वैचारिक मतभेद आहेतच ते विसरुन विकासाच्या कामास प्राधान्य देणारे भारतीय जनता पक्षाचे लोकनेते मुंडे साहेबांचा मला आदर आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांची ग्रामिण भागाशी नाळ घट्ट जोडली गेली असल्याने तळागळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते, असेही जलील म्हणाले.
शिवसैनिकांनी लोकवर्गणीतुन पुतळे बांधावे..
शिवसेना पक्षातील सर्व नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे स्मारक व पुतळयांचे बांधकाम लोकवर्गणीतुन करण्याचे सुचना देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे केली. तसेच महाराष्ट्रात महापुरुषांचे स्मारक शासकीय निधीतुन उभारण्या ऐवजी त्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेसाठी अद्यावत रुग्णालय, शाळा, महाविद्यालय व हॉस्टेल उभारण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे असेही जलील म्हणाले.
यामुळे मुंडेंच्या स्मारकाला विरोध केला...
गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्मारक उभारुन काहीही साध्य होणार नव्हते. औरंगाबाद शासकीय दूथ डेअरी येथे उभारण्यात येणाऱ्या त्यांच्या स्मारकाला मी प्रखरतेने व आक्रमकतेने विरोध केला होता.गोपीनाथ मुंडे साहेबांना खरी श्रध्दांजली म्हणजे रुग्णालय हेच असणार आहे. म्हणुन मी शासनाने घोषित केलेल्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याएवेजी सुसज्ज रुग्णालय उभारावे त्याकरिता मी आमदार असतांना विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता, असेही जलील म्हणाले.