एक्स्प्लोर

Aurangabad: आधी महिलेवर अत्याचार केला; त्यांनतर अत्याचाराचा व्हिडीओ गावात व्हायरल केला

Aurangabad Crime News:

Aurangabad Crime News: औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील घोसला गावात संतापजनक घटना समोर आली आहे. एका चाळीस वर्षीय महिलेच्या मुलास आणि भावास जीवे मारुन टाकण्याची धमकी देत एकाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचाराचा व्हिडीओ तयार करुन गावात व्हायरल केला. त्यांनतर महिलेच्या भावाने केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून तीच्या पोटावर भिलावा (बिबा) चोळुन त्वचा जाळली. घोसला गावात दहा जून रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान ही घटना घडली. तर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबा अंबादास कोळी (रा. घोसला, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला लग्नसमारंभातून घरी जात असताना कोळी याने दुचाकी आडवी लावून तिचा रस्ता अडवला. बहिणीच्या घरी सोडून देतो असे सांगितले. मात्र महिलेने नकार दिला. त्यामुळे तिच्या मुलाला आणि भावाला जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेला बळजबरीने दुचाकीवर बसवले. यानंतर तब्बल बारा किलामीटर लांब असलेल्या घोसला (ता. सोयगाव) गावातील त्याच्या शेतात पिडीत महिलेला घेऊन गेला. त्यांनतर महिलेवर अत्याचार केला. तसेच अत्याचार करतानाचा व्हिडीओ स्वत:च्या मोबाइलमध्ये बनवून ठेवला. 

व्हिडीओ केला व्हायरल...

आरोपीने पिडीत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याने ती प्रचंड घाबरून गेली. त्यामुळे घडलेला प्रकार तिने कुणालाही सांगितला नाही. मात्र त्यांनतर चार दिवसांनी आरोपीने गावातील लोकांच्या मोबाईलवर अत्याचाराच्या व्हिडिओ व्हायरल केला. पाहता-पाहता व्हिडिओ संपर्ण गावात व्हायरल झाला. हा व्हिडिओ महिलेच्या कुटुंबातील सदस्यांपर्यंत सुद्धा पोहचला. महिलेच्या कुटुबिंयानी तीला विश्वासात घेऊन संपुर्ण हकीकत विचारली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.

महिला दहशतीखाली?

मुलाला आणि भावाला जीवे मारण्याची धमकी देत पिडीत महिलेवर अत्याचार करण्यात आलेल्या घटनेमुळे महिला प्रचंड दहशतीखाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कुटुंबातील लोकांनी तिला धीर देत विश्वासात घेऊन घडलेला प्रकार जाणून घेतला. मात्र आपला व्हिडिओ व्हायरल झाल्याने महिला प्रचंड घाबरलेली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget