(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad Crime: औरंगाबाद पुन्हा हादरलं! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फरपटत नेत अत्याचार
औरंगाबाद जिल्हा पुन्हा एकदा हादरला असून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: आठवडाभरापूर्वी औरंगाबाद शहरात एका 19 वर्षीय तरुणीचा एकतर्फी प्रेमातून भरदिवसा खून केल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबाद जिल्हा पुन्हा हादरलं आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं तोंड दाबून शेतात फरपटत नेत अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा गावात घडला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर पोलिसांनी अनिकेत उर्फ अन्या ज्ञानेश्वर चव्हाण ( वय-२१वर्ष, रा. गवळीशिवरा, ता. गंगापूर) या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे वाजता अल्पवयीन पीडिता अंघोळीसाठी बाथमरूममध्ये जात होती. यावेळी तिच्यावर पाळत ठेवून असलेला नराधाम अनिकेतने तिचा तोंड दाबून तिला फरपटत गायरान शेतीमध्ये घेऊन गेला. त्यांनतर पाण्याच्या हौद जवळ नेऊन पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली. याचाच फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि फरार झाला.
या सर्व घटनेनं पीडित मुलगी घाबरली होती. त्यांनतर घडलेला सर्व प्रकार मुलीने घरातील सदस्यांना सांगितला. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी मुलीसह शिल्लेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीनुसार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
महिलांच्या सुरक्षेचा चिंतेचा विषय...
औरंगाबाद जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या आठवड्यात शहरातील देवगिरी कॉलेजच्या जवळ एका 19 वर्षीय तरुणीचा एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. त्यांनतर आता पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा चिंतेचा विषय बनला आहे.
शहरात खुनाच्या घटना वाढल्या...
गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाच्या घटना वाढल्या असल्याचे चित्र आहे. शहरात एकामागे एक खुनाच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे शहरात सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. 21 मी रोजी 24 तासात शहरात तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यांनतर दुसऱ्यादिवशी पुन्हा एकदा पत्नी-पत्नीचा घरात मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत आहे.