एक्स्प्लोर

Aurangabad: ठाणेप्रमुखावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एका अधिकाऱ्यावर हल्ला

Aurangabad Crime News: अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेणाऱ्या पथकावर सुद्धा आरोपीने हल्ला केला.

Aurangabad Crime: औरंगाबादच्या जिन्सी पोलीस ठाण्याचे प्रमुख व्यंकटेश केंद्रे यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे केंद्र यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी शेख मुजाहिद याने पुन्हा एकदा एका सहायक उपनिरीक्षकावर हल्ला केला आहे. ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना मुजाहिदने सहायक उपनिरीक्षक नजीर खान सुबान खान यांच्यावर हल्ला केला. 

नेमकं काय घडलं...

केंद्रे हे जिन्सी पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख आहे. मंगळवारी पोलीस ठाण्यात त्यांना एक सामजिक संघटनेच शिष्टमंडळ भेटायला आले होते. शिष्टमंडळाकडून केंद्र सत्कार स्वीकारतच असताना शेख मुजाहिद नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने केंद्र यांच्यावर अचानकपणे चाकू हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला होता. त्यांनतर केंद्र यांना तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. 

पुढील 48 तास महत्वाचे...

केंद्र यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. अतिरक्तस्त्राव झाल्याने रात्रीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनतर त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आहे. खुद्द पोलीस आयुक्त निखील गुप्ता हे केंद्र यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराचा आढावा घेत आहे. मात्र आरोपीने केलेल्या चाकू हल्ल्यात एक वार पोटात आणि दुसरा पोट आणि छातीच्या मध्यभागी लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला आहे.  त्यामुळे पुढील 48 तास महत्वाचे असल्याच डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.  

आरोपीला पोलीस तीन दिवसांची कोठडी

आरोपी शेख मुजाहेद शेख उस्मान (वय 55, रा. कटकट गेट) याला बुधवारी न्यायालयात हजर केले. हल्ल्याचा उद्देश काय होता?, त्याला कोणाची साथ आहे का?, जुना वाद नेमका काय?, याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली. त्यावरून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची (दि. 25 जूनपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget