एक्स्प्लोर
पुढच्या वर्षापासून मी 'मराठवाडा मुक्ती संग्राम'ला येणार, त्या दिवशी मी मंत्रालयात होतो : खासदार इम्तियाज जलील
मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस रझाकारापासून मुक्तीचा मानला जातो. इतिहासातील एमआयएम हा पक्ष रझाकारांच्या बाजूचा होता, अशी टीका एमआयएमवर होते. त्यातच आता जलील यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाला मुंबईमध्ये मंत्रालयात कामात होतो म्हणून येऊ शकलो नाही, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. मात्र पुढच्या वर्षापासून मी मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिवशी कार्यक्रमाला येणार असेही जलील म्हणाले. काही विकास कामं अडकली होती म्हणून त्या दिवशी मंत्रालयात होतो. माझ्या देशभक्तीचे प्रमाणपत्र कुणी मागायची गरज नाही, मला रझाकाराची औलाद म्हणणाऱ्यांनी स्वतः मराठवाड्यासाठी काय केलं याचं उत्तर द्यावे असेही जलील म्हणाले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणाला इम्तियाज जलील यांची दांडी
एमआयएम रझाकरांचा पक्ष नाही. रझाकार पाकिस्तानात गेलेत, आम्ही भारतीय आहोत याच भान ठेवा असेही जलील म्हणाले. मी माझी भाषा सुरू केली तर यांची तोंडं बंद होतील असेही जलील म्हणाले. मीर कासीम रिझवी यांनी हा पक्ष स्थापन केला हे खरंय मात्र तो त्यावेळी पाकिस्तानात गेला आणि आम्ही भारतात आहोत हे लक्षात घ्या, असेही जलील म्हणाले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दांडी मारली होती. सलग चार वर्षे आमदार असताना आणि आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही जलील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं टाळलं. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली.
17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनादिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण केलं गेलं. शिष्टाचारानुसार या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार उपस्थित राहणं अपेक्षित असतं. इम्तियाज जलील हे आमदार पदाच्या आपल्या कार्यकाळात या सोहळ्याला गैरहजर राहिल्यामुळे, त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता. मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस रझाकारापासून मुक्तीचा मानला जातो. इतिहासातील एमआयएम हा पक्ष रझाकारांच्या बाजूचा होता, अशी टीका एमआयएमवर होते. त्यातच आता जलील यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement