एक्स्प्लोर
Advertisement
स्पर्धा परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांचा औरंगाबादेत अर्धनग्न मोर्चा
राज्य सरकारचे महापोर्टल बंद करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांसाठी आज (बुधवार) औरंगाबादेत एक अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला.
औरंगाबाद : राज्य सरकारचे महापोर्टल बंद करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांसाठी आज (बुधवार) औरंगाबादेत एक अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. औरंगाबादच्या पैठणगेट येथून या मोर्चाला सुरुवात झाली आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला.
महापोर्टल ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून निवड समितीकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी, पीएसआय पूर्व परीक्षा संयुक्त परीक्षेमधून वगळून स्वतंत्र घेण्यात यावी, एमपीएससीच्या वेळापत्रकासोबत जागांची आकडेवारी जाहीर करावी. उत्पादन शुल्क एमपीएससीच्या जागा वाढवाव्यात. पोलीस भरतीचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे, या मागण्यांसाठी हा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला होता.
राज्यातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळांवरुन माहिती घ्यावी लागत होती. त्यावर उपाय म्हणून राज्य शासनाने विविध परीक्षांसाठी एकच ई महा परीक्षा पोर्टल सुरु केले. विद्यार्थ्यांच्या परीक्षेपासून ते निकालापर्यंत सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना याच पोर्टलवर पाहता येतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व
राजकारण
Advertisement