एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबादेत 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी मुस्लीम तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक, चौघे फरार
मुस्लीम तरुणास अडवून मारहाण करत 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार काल औरंगाबादेत (19 जुलै) समोर आला होता. याप्रकरणी एकाला औरंगाबाद शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
औरंगाबाद : मुस्लीम तरुणास अडवून मारहाण करत 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार काल औरंगाबादेत (19 जुलै) समोर आला होता. याप्रकरणी एकाला औरंगाबाद शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच आणखी 4 ते 5 जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इम्रान पटेल हा तरुण औंरगाबादमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. कामावरून रात्री घरी परतत असताना हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगर येथे आठ ते दहा तरुणांनी त्याला अडवलं. त्यापैकी एकाने इम्रानच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली आणि कुठे राहतो असं विचारलं. त्यानंतर टोळक्याने शिवीगाळ करुन जय श्रीराम बोलण्यास जबरदस्ती केली. इम्रानने जय श्रीराम न म्हटल्याने त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या इम्रानने त्यांच्यासमोर जय श्रीराम म्हटलं.
व्हिडीओ पाहा
मात्र त्यानंतरही टोळक्याने त्याला मारहाण केली. दरम्यान आरडाओरडा ऐकून जवळील गणेश नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी घरातून बाहेर आले. त्यांनी टोळक्याच्या तावडीतून इम्रानची सुटका केली. घटनेनंतर घाबरलेल्या इम्रानने आज बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
विश्व
Advertisement