Aurangabad News : डोकेदुखी सहन होत नसल्याने 21 वर्षीय विद्यार्थिनीने केली आत्महत्या; सुसाईड नोटही लिहिली
Aurangabad News : औरंगाबाद शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. डोकेदुखीचा त्रास सहन होत नसल्याने एका 21 वर्षे विद्यार्थिनी चक्क आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचललं आहे.
Aurangabad News : औरंगाबाद शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. डोकेदुखीचा (Headache) त्रास सहन होत नसल्याने एका 21 वर्षे विद्यार्थिनी चक्क आत्महत्या (Suicide) करत टोकाचे पाऊल उचललं आहे. "माझी डोकेदुखी आता मला सहन होत नाही. मी हे पाऊल माझ्या डोकेदुखीमुळे उचलत आहे. याचा तुम्हाला प्रचंड त्रास होईल. मम्मी-पप्पा सॉरी," अशी सुसाईड नोट लिहून ठेवत या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. ही घटना 31 जुलैच्या रात्री हर्सूलमधील सुरेवाडी भागात घडली आहे. प्रिया रमेश बुजाडे (वय 21 वर्षे, सुरेवाडी, हर्सूल) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रिया आई-वडिलांसोबत राहत होती, तिला मोठी बहीण व लहान भाऊ आहे. प्रिया अभ्यासात हुशार होती. शांत स्वभावाच्या प्रियाला टेक्नॉलॉजीतच करिअर करण्याची आवड होती. दरम्यान, तिला डोकेदुखीचा प्रचंड त्रास सुरु झाला होता. डोकेदुखी तिला सहन होत नव्हती. त्यामुळे अभ्यास होत नव्हता. दरम्यान याचा परिणाम तिच्या शिक्षणावर होत होता. त्यामुळे परीक्षेत सुद्धा तिला कमी गुण मिळायचे. नुकताच तिने दिलेला एक पेपरही कमी गुणांचा सोडवला होता.
दरम्यान, सोमवारी (31 जुलै) ती अभ्यासासाठी तिच्या खोलीत होती. तेथेच तिने आत्महत्या केली. ती बाहेर येत नसल्यामुळे पालकांनी आवाज दिला. प्रियाकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे घरच्यांनी तिला तात्काळ घाटीत दाखल केले. त्यानंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय लिहिलं आहे सुसाईड नोटमध्ये?
'गेल्या 20 दिवसांपासून माझे डोके दुखत आहे. ते माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. मी हे पाऊल माझ्या दुखण्यामुळे उचलत आहे. यामुळे सर्वांना त्रास होईल. मम्मी, पापा सॉरी...' असे प्रियाने सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
कुटुंबाला मोठा धक्का!
प्रिया ही कुटुंबातील सर्वांची लाडकी होती. तसेच अभ्यासात देखील ती हुशार होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून तिला सतत डोकेदुखीचा त्रास होत होता. तिच्या कुटुंबाने तिला अनेक ठिकाणी उपचारासाठी दाखवलं. मात्र तिची डोकेदुखी मात्र काही, कमी झाली नाही. नेहमीच्या या डोकेदुखीला प्रिया वैतागली होती. यामुळे होणारा त्रास तिच्या सहनशक्तीच्या पलिकडे गेला होता. या सर्व त्रासाला कंटाळून तिने अखेर आत्महत्या केली. तर या घटनेचा प्रियाच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा
Ulhasnagar: बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून दाम्पत्याची आत्महत्या; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट